Published on
:
15 Nov 2024, 12:53 pm
Updated on
:
15 Nov 2024, 12:53 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, दारुच्या नशेत ती संजय कपूरच्या पार्टीमध्ये गेली होती. तिथे पहिल्यांदा संजय कपूरशी भेट झाली. त्यानंतर 'वन नाईट स्टॅण्ड' झालं. आज दोघांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
२०२० मध्ये नेटफ्लिक्स शो ‘फॅबुलस लाईव्स ऑफ बॉलीवुड वाईव्स’मध्ये दिसल्यानंतर महीप कपूर अधिक प्रकाशझोतात आली. महीपने अभिनेता संजय कपूरशी लग्न केले. महीपने आधी वन नाईट स्टॅण्ड आणि नंतर लग्नाविषयी सांगितले. नुकताच एका शोमध्ये महीपने सांगितले की, ती कशाप्रकारे संजयला भेटली आणि वन नाईट स्टॅण्ड नंतर लग्न कसे झाले?
महीपने सांगितले की, “मी ज्या व्यक्तीसोबत वन नाईट स्टॅण्ड केलं आणि मला कधीच माहिती नवहतं की, माझे लग्न त्या व्यक्तीशी होईल. मी त्याच्या पार्टीत शिरले. तिथे माझी भेट संजयशी झाली. मी नशेत होते.” महीपने म्हणाली, “मी संपूर्ण परिवाराला भेटले, सासू-सासरे… तुम्ही माझ्या परिवाराला ओळखता ना? अनिल कपूर, सुनीता, श्रीदेवी... आणि मी नशेत टल्ली होते. तरीही त्यांनी माझा स्वीकार केला आणि म्हटलं, ‘वा, काय सून आहे. त्यांनी खुल्या मनाने माझे स्वागत केले.”
तिने सांगितले की, कशाप्रकारे वन-नाईट स्टॅण्ड तेलग्नापर्यांत कुी कुणालाच प्रपोज केलं नाही. महीपने सांगितले, “आमच्याकडे हे सर्व प्रपोजल वगैरे काही नव्हतं. आमच्याकडे इन्स्टाग्राम नव्हतं..संजयने केवळ इतकं सांगितलं की, आपण करत आहोत.”
महीपने ५ वर्षे एकमेकांना डेट केलं आणि मग लग्न केले.