सर्वांगीण विकासाची हमी आणि विजयाचे आवाहन
नागपूर (Chandrasekhar Bawankule) : आजच्या काळात शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठा, रोजगारासाठी संधी, मुलभूत सुविधा आणि सुरक्षितता यांची गरज आहे. भाजप सरकार हे केवळ वचन देणारे सरकार नाही, तर वचन पूर्ण करणारे सरकार आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, की तुमच्यासाठी जीवापाड मेहनत करून नागपूर ग्रामीण भागाला एक आदर्श मतदारसंघ बनवण्याचा माझा संकल्प असल्याचे श्री बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी नमूद केले. कामठी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मला सदैव प्रेरणा देतात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- महायुती उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी नागपूर ग्रामीण तालुक्यातील डोंगरगाव, जामठा, परसोडी, खापरी गावठाण, खापरी पुनर्वसन, शंकरपूर, सालई, चिकना, हुडकेश्वर, पिपळा कॉलनी आणि पिपळा गावातील मतदारांशी संवाद साधला.
या भागाच्या विकासासाठी वचनबद्ध असल्याचे नमूद करीत श्री बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, नागपूर शहरालगत असलेल्या या भागात शेतकऱ्यांच्या समस्यांसह रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक प्रगती या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. हा परिसर कामठी विधानसभा क्षेत्राचा भाग असल्याने माझ्यासाठी तुम्ही केवळ मतदार नाही, तर माझ्या कुटुंबाचा एक भाग आहात. गेल्या काही वर्षांत आपण दिलेल्या पाठिंब्यामुळेच भाजप सरकारने महाराष्ट्रात अनेक विकासप्रकल्प साकार केले आहेत.
मात्र, आपल्या भागाचा विकास अजून अधिक गतीने व्हावा यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यावेळी (Chandrasekhar Bawankule) दुर्गा शंकर ठाकूर, रुपलाल शिंगणे, यशपाल भटेरो, केशव सोनटक्के, सचिन घोडे, सुनील कोडे, नरेश भोयर, दिलीप नंदागवळी, पप्पू ठाकूर, कोहराम, टेकाम, ढगे, रोकडे, अमोल मेश्राम, बोरगे, केशव सोनटक्के, सुनील बोरीकर, सचिन मस्के, सौ. सोनटक्के, प्रमोद डेहनकर, सुनील बोरीकर, विनोद ठाकरे, सचिन इंगळे, रत्नाकर काळपांडे, दामू शिंदे, बाळू शिंगणे, गुलशन मानकर, प्रमोद मिसाळ, मुकेश भोयर, राजू बोटरे, सुनील कोहळे, वानखेडे, सचिन घोडे आदींची उपस्थिती होती.