पोलीस व एफएसटी पथकाची कारवाई
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : पोलीस प्रशासन व एफएसटी पथकाने शुक्रवार रोजी दुपारी केलेल्या कारवाईत गंगाखेड शहरातील एका घरात एकोण चाळीस लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. सदर रक्कमेची मोजणी करून जप्तीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीत मतदारांना पैसे वाटप केल्या जात असल्याची चर्चा होतं असल्यामुळे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आदित्य लोणीकर, डी. बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस शिपाई परसराम परचेवाड आदींचे पथक शहरात गस्तीवर असतांना शहरातील क्षीरसागर कॉलनीतील एका घरात मोठी रक्कम असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने या (Gangakhed Crime) पथकाने याची माहिती पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्यासह एफएसटी पथकाला दिल्याने पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सपोनि आदित्य लोणीकर, डी. बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस शिपाई परसराम परचेवाड, अनंत डोंगरे, महिला पोलीस कर्मचारी गंगासागर पौळ, चालक सुग्रीव सावंत, एफएसटी पथकाचे प्रमुख समाधान पवार, सहाय्यक राहुल रेंगे, सशस्त्र पोलीस शिपाई संगम नलबले, कॅमेरामन मुकुंद मुरकुटे, शासकीय पंच महादेव काडवदे, अविनाश राठोड, चालक मुंडे आदींनी क्षीरसागर कॉलनीतील एका घराची झडती घेतली असता त्यात एकोण चाळीस लाख नव्वद हजार रुपये (३९९०००० रु.) रोख मिळून आले. सदर रक्कमेची मोजदाद करून आयकर विभागाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्कम जप्तीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलीस प्रशासन व निवडणूक विभागाच्या एफ एस टी पथकाने केलेल्या या कारवाईने शहरात मात्र खळबळ उडाली आहे.
गंगाखेड शहरातील (Gangakhed Crime) एका घरात सापडलेली रक्कम घराच्या बांधकामाचे साहित्य घेण्यासाठी तसेच सुरु असलेल्या बांधकामाकरिता आणलेल्या साहित्याची उधारी देण्यासाठी घर मालकाने घरात आणून ठेवल्याचे पोलीसांना सांगितल्याचे समजते.