आयपीएल मेगा लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 574 खेळाडूंची नाव निश्चित करण्यात आली आहेत. म्हणजेच 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी एकूण 574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. चला जाणून घेऊयात संपूर्ण यादी
आयपीएल मेगा लिलावासाठी जगभरातील 1574 खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 1000 नावं बाद झाली आहेत आणि 574 खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यापैकी 204 खेळाडूंना फ्रेंचायझींकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी 574 खेळाडूंची नावं लिलावात असल्याचं जाहीर केलं आहे. या खेळाडूंचा फैसला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. 574 खेळाडूंपैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी आहेत. यात 48 कॅप्ड भारतीय खेळाडू आहेत. तसेच 318 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मेगा लिलावासाठी 193 विदेशी कॅप्ड खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. तर 12 अनकॅप्ड खेळाडूही लिलावात असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच सहयोगी राष्ट्रांतील 3 खेळाडू आहेत. मेगा ऑक्शनमध्ये उतरलेल्या 81 खेळाडूंची बेस प्राईस ही 2 कोटी रुपये आहे. तर 27 खेळाडूंची बेस प्राईस ही 1.50 कोटी आहे. 18 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस ही 1.25 कोटी ठेवली आहे.
10 फ्रेंचायझींची रिटेन्शन यादी पाहता आता एकूण 204 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत. यात 70 जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत.
🚨 NEWS 🚨
TATA IPL 2025 Player Auction List Announced!
All the Details 🔽 #TATAIPLhttps://t.co/QcyvCnE0JM
— IndianPremierLeague (@IPL) November 15, 2024