समीर मेघेंसाठी स्त्रीशक्तीचा जागर; सहचारिणी, वहिनी, बहिणी गाजवताहेत सभा
नागपूर (MLA Sameer Meghe) : हिंगणा विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे यांच्या प्रचारात संपूर्ण कुटुंबच सहभागी झाल्यामुळे गावागावातील घरांमध्येही पारिवारिक उत्साह पाहायला मिळतो आहे.
समीर मेघे यांचे ज्येष्ठ बंधू माजी आमदार सागर मेघे (MLA Sameer Meghe) हे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कर्तेधर्ते असून नेहमीप्रमाणे ‘किंग मेकर’ची भूमिका ते बजावत आहेत. आ. समीर यांचे सुपुत्र राघव हे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करताना या प्रचारयात्रेत दिसून येत आहेत. इतरवेळी राजकारणापासून अलिप्त राहणाऱ्या या तरुणाने अत्यंत संयत, शांत आणि निगर्वी स्वभावामुळे आपली वेगळी छाप समवयीन तरुणाईसोबतच ज्येष्ठांमध्येही निर्माण केली आहे. मात्र खरी चर्चा आहे ती समीर मेघे यांची सहचारिणी, वहिनी आणि भगिनींनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे.
या प्रचारयात्रेत अगदी पहिल्या दिवसापासून समीर यांच्या पत्नी वृंदा मेघे या सहभागी झाल्या आहेत. मारवाडी कुंटुंबातून (MLA Sameer Meghe) मेघे परिवारात आलेल्या वृंदा भाषिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन परिसरातील बंधुभगिनींशी संवाद साधत आहे. अगदी घरोघरी चालणाऱ्या छोटेखानी परंपरागत हळदीकुंकू कार्यक्रमांपासून तर छट पूजेच्या पारिवारिक धार्मिक सोहळ्यापर्यंत सर्वत्र त्यांचा सहभाग दिसून आला आहे. केवळ निवडणूक आहे म्हणून नव्हे तर इतरवेळीही मी अशा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते, असे वृंदा मेघे यांनी सांगितले. कॉर्नर मीटिंगपासून तर महिला मेळाव्यांपर्यंत सर्वत्र त्यांचा वावर दिसून येतो आहे.
समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या वहिनी तथा सागर यांच्या सहचारिणी देविका मेघे आपल्या दिराच्या प्रचारकार्यात हिरीरीने पुढाकार घेत आहे. जन्मजात राजकीय वारसा लाभलेल्या देविका मेघे लोकांशी सहजपणे संवाद साधत समीर मेघे यांच्या विकासकार्याची, दहा वर्षातील वाटचालीची मांडणी विविध सभांमध्ये करताना दिसतात. या प्रचारकार्यासोबतच वार्डावार्डातील, (Hingana Assembly Elections) गावखेड्यातील भगिनींना स्वयंपूर्ण होण्यासाठी त्या प्रेरणास्रोत म्हणून वावरतानाही या निवडणुकीत दिसून येत आहेत. तर समीर यांच्या ज्येष्ठ भगिनी स्मिता मेघे व संगीता ग्रोव्हर यांनीही आपल्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावासाठी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. थोरली बहीण स्मिता मेघे या सामाजिक क्षेत्रात महाविद्यालयीन काळापासून कार्यरत असून त्या उत्तम व प्रभावी वक्त्या असल्याने त्यांच्या संवादाला सकारात्मक प्रतिसाद सर्वत्र लाभतो आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. (MLA Sameer Meghe) समीर मेघे यांच्या पाठीशी त्यांची आई शालिनीताई मेघे यांचे आशीर्वाद सदैव असतात. त्यासोबतच, पत्नी वृंदा, वहिनी देविका आणि भगिनी स्मिता व संगीता यांच्या रूपाने स्त्रीशक्तीचा सशक्त पाठींबा समीर मेघे यांचा आत्मविश्वास द्विगुणित नव्हे तर चौगुणित करताना दिसून येत आहे.