एसटीची दुभाजकाला धडक:जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यातील घटना
2 hours ago
1
भरधाव एसटी चालवून दुभाजकाला धडकवित झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला चालक उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला आहे. हा अपघात २ जूनला रात्री एकच्या सुमारास पेरणे ता. हवेली परिसरात झाला होता. सतीशकुमार बाबासाहेब वारे (वय ३६ रा. आदर्शनगर, पाथर्डी, नगर) असे मयत झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नीलेश घोरपडे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी चालक सतीशकुमार वारे हा २ जूनला रात्री एकच्या सुमारास पेरण परिसरातून बस घेउन पुण्याकडे येत होता. त्यावेळी त्याने भरधाव एसटी चालवून दुभाजकाला धडक दिली होती. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. एसटी प्राधिकरणाने उशिरा अहवाल दिल्यामुळे गुन्हा दाखल होण्यास उशिर झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश घोरपडे पुढील तपास करीत आहेत. स्वारगेट एसटी स्थानकात बसमधून ६ लाखांचे दागिने लंपास स्वारगेट एसटी स्थानकातून प्रवास करीत कोल्हापूरला जाण्यासाठी गाडीत बसलेल्या एका सराफाच्या कामगाराच्या पिशवीतील ६ लाख ६० हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी तरूणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मूळचा कोल्हापूरमधील रहिवाशी आहे. तो कोल्हापूरातील सराफाकडे कामाला असून, दागिने देण्यासाठी पुण्यात आला होता. काम आटोपल्यानंतर तो स्वारगेट एसटी स्थानकात आला. कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या गाडीत त्याने दागिन्यांची पिशवी ठेवली. त्यानंतर तो बस केव्हा सुटणार आहे, याची माहिती घेत होता. त्याचवेळी चोरट्याने त्यांच्या पिशवीतील साडेसहा लाखांचे दागिने चोरून नेले. काही वेळानंतर तरूणाला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पुनम पाटील पुढील तपास करीत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)