Urmila Matondkar: लग्नाच्या 8 वर्षांनंतर उद्ध्वस्त होणार उर्मिलाचा संसार, नवऱ्याला देणार घटस्फोट!

1 hour ago 1

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर हिचं वैवाहिक आयुष्य कायद्याच्या कचाट्यात, लग्नाच्या 8 वर्षांनंतर मोडणार संसार, होणार घटस्फोट... काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिला मातोंडकर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

 लग्नाच्या 8 वर्षांनंतर उद्ध्वस्त होणार उर्मिलाचा संसार, नवऱ्याला देणार घटस्फोट!

| Updated on: Sep 25, 2024 | 8:02 AM

झगमगत्या विश्वात घटस्फोट आता सामान्य गोष्ट झाली आहे. आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने देखील पती मोहसिन अख्तर मीर (Mohsin Akhtar Mir) याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. उर्मिला हिचं वैवाहिक आयुष्य आता कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मुंबई न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. अशा परिस्थितीत उर्मिला मातोंडकरचा हा घटस्फोट परस्पर संमतीने होत नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. पण यामागचं नक्की कारण अद्याप समोर आलेलं नाही. अभिनेत्रीने देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article