Uddhav Thackery onslaught connected Vinod Tawade : विरारमध्ये हा आज संपूर्ण देशाने हाय होल्टेज ड्रामा पाहीला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांना जवळपास चार तास हॉटेल विवांतामध्ये घेराव टाकण्यात आला. त्याचा आता उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरे तावडेंवर कडाडले
विरारमध्ये झालेल्या ड्राम्याने लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. विरार पूर्वेतील मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांना तावडे यांना जवळपास चार तास घेराव घातला. या हायहोल्टेज ड्राम्यामळे सर्वच जण आवाक झाले आहेत. प्रत्येक पक्षातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया येत आहे. तर तुळजापूर येथे आले असताना उद्धव ठाकरे यांनी त्याच खरपूस समाचार घेतला. ते विनोद तावडे यांच्यावर कडाडले.
थोड्याच वेळात सविस्तर बातमी…