जळगावात दोन मित्रांपाठोपाठ नववीतील मुलाची आत्महत्या:सव्वा महिन्यात 3 मित्रांनी संपवले जीवन
2 hours ago
1
सव्वा महिन्यात नववीतील तिसऱ्या मित्राने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी दीड वाजता शहरातील चंद्रप्रभा काॅलनीत उघडकीस आली. घरात एकटाच असताना स्टूलवर चढून मफलरने गळफास घेतला. ओम ऊर्फ साई पंडित चव्हाण (१५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. यापूर्वी ओमच्या दोन मित्रांनीही आत्महत्या केली असून ते दोघे मित्र मला बोलावतात असे तो अनेक दिवसांपासून म्हणत होता. अखेर ओमनेही सोमवारी जीवन संपवले. रिंगराेडवरील प्राेग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एकाच वर्गात इयत्ता इयत्ता नववीच्या ब तुकडीत ओम (रा.चंद्रप्रभा काॅलनी) आणि वेदांत पंकज नाले (१५, रा. निवृत्तीनगर) शिक्षण घेत होते. ते दोघे आणि स्कूलच्या शेजारी असलेल्या केसीई इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये इंजिनिअरिंगला असलेला हर्षल सुधाकर साेनवणे (१७) हे तिघे मित्र हाेते. ओम हा एकटाच घरी होता मूळचे लेहतांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी असलेले पंडित चव्हाण हे चंद्रप्रभा काॅलनीत तीन वर्षांपूर्वी घर विकत घेऊन वास्तव्यास आले आहेत. चव्हाण दांम्पत्य दवाखान्यात गेले होते. दाेन वाजेच्या सुमारास चव्हाण दांपत्य घरी परतले तेव्हा त्यांनी घराचा दरवाजा ठाेठावला. उघडला नाही म्हणून मागील बाजूला दुसरा दरवाजा ठोठावण्यास गेले असता मागच्या खाेलीच्या उघड्या खिडकीतून ओम हा छताला असलेल्या कडीला मफलरने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावत अाले व त्यांच्या मदतीने मागच्या लकडी दरवाजाला लाथा मारून ताेडले. घरात प्रवेश करून त्याला खाली उतरवून रिक्षेने जीएमसीत आणले. येथे डाॅक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घाेषित केले. ते दोघे मला बाेलवतात ख्वाजामियाँ चाैक ते आयएमआर काॅलेजदरम्यान केसीई इंजिनिअरिंग काॅलेज व प्राेग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल या दाेन शैक्षणिक संस्था आहेत. हर्षल, वेदांत व ओम ऊर्फ साई अनेकदा चंद्रप्रभा काॅलनीच्या बगिच्यातही साेबत खेळत असत. सर्वात अगाेदर २१ ऑक्टाेबर राेजी हर्षलने दादावाडीत मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर गेले अनेक दिवस ओम म्हणायचा ते दोघे मला बोलावत आहेत. १३ दिवसांनी २ नाेव्हेंबर राेजी रात्री ९.४५ वाजता वेदांतने गळफास घेतला. त्याचा ४ राेजी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ओमने साेमवारी आत्महत्या केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)