दिव्य मराठी अपडेट्स:भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याच्या तयारीत; मार्चअखेर निवडणुका

2 hours ago 1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स मार्चअखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जळगाव - विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे. पक्षाला चांगले वातावरण असून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाला आहे. जास्तीत जास्त सदस्य नाेंदणी करण्याच्या सूचना देत चार महिन्यात निवडणुकींना सामाेरे जाण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवत भाजप राज्यातील सर्वात माेठा पक्ष ठरला आहे. महायुतीचे सरकार स्थापन हाेणार असल्याने भाजपसह मित्रपक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान विजयाला 48 तास उलटत नाही ताेपर्यंत भाजपकडून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुंबईत घेतली. या वेळी जास्तीत जास्त सदस्य नाेंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अयोध्या प्राणप्रतिष्ठा साेहळा वर्धापन दिन 11 जानेवारीला अयोध्या - प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पुढील वर्षी 22 जानेवारीला एक वर्ष पूर्ण होणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. मात्र, या दिवशी अयोध्येत कोणताही कार्यक्रम होणार नाही. सोमवारी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की 22 जानेवारी ही इंग्रजी तारीख आहे, तर हिंदू धर्मात तिथींच्या आधारे सण साजरे करण्याची परंपरा आहे. त्यामुळे 22 जानेवारीला रामलल्लांचा पटोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामलल्लांच्या अभिषेकाचा दिवस पौष शुक्ल द्वादशी होता, ज्याला कूर्म द्वादशी असेही म्हणतात. त्यामुळे 11 जानेवारी 2025 रोजी पौष शुक्ल द्वादशीला प्राणप्रतिष्ठा पटोत्सव कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. संतांनी या उत्सवाला ‘प्रतिष्ठा द्वादशी’ असे नाव दिले आहे. पहिल्या वर्षी हा महोत्सव तीन दिवसांचा असेल. मुस्लिमांवर बहिष्काराचे आवाहनकरणाऱ्या सज्जाद नोमाणींची माफी नागपूर - भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमाणी यांनी आता जाहीर माफी मागितली आहे. ‘आपण केलेले वक्तव्य एका विशिष्ट संदर्भात, तेही सप्टेंबर महिन्यातील होते. तेव्हा काही लोकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यात आले होते. त्या संदर्भात मी बाेललो होतो. हे वक्तव्य कोणत्याही समाजाविरोधात नव्हते. माझा तसा उद्देशही नव्हता. हा फतवाही नव्हता. तरीही माझ्या या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि बिनशर्त माफी मागतो,’ असे नोमाणींनी म्हटले आहे. नोमाणी यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण द्या, दंगलीतील मुस्लिमांविरोधातील खटले काढून घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला आदी 17 मागण्यांचे निवेदनही दिले होते. काँग्रेसने ते मान्य केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, निवडणुकीत आघाडीचा पराभव झाल्यानंतर नोमाणी यांनी माफीनामा काढला आहे. गडचिरोलीत स्फोटके पेरून ठेवणाऱ्या आरोपीस अटक नागपूर - गडचिरोलीतील पर्लकोटा नदीवरील पूल उडवून देण्याचा माओवाद्यांचा कट पोलिसांनी 16 नोव्हेंबरला उधळला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचार दौऱ्याच्या एक दिवस आधी हा कट आखण्यात आला होता. त्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. भामरागड आणि ताडगावला जोडणा­ऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवली होती. 16 नोव्हेंबरला बीडीडीएस पथकाच्या साहाय्याने पुरून ठेवलेली स्फोटके नष्ट करण्यात पोलिसांना यश आले होते. या घटनेपासून फरार झालेला आरोपी आरोपी पांडू कोमटी मट्टामी (35, रा. पोयारकोटी, ता.भामरागड) याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांना आरोपी मट्टामी हा भामरागड जंगल परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर पोलिस उपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या नेतृत्वातील टीमने नाकेबंदी करत अटक केली. सखोल चौकशी केली असता त्याने आपण पांडू कोमटी मट्टामी असल्याचे सांगितले. जायकवाडीतून "रब्बी''साठी‎यंदा तीन आवर्तने मिळणार‎ पैठण‎ - जायकवाडी धरणातून रब्बी पिकांसाठी‎तीन पाणी पाळ्या व उन्हाळी पिकांसाठी‎चार पाणी पाळ्या देण्याचा निर्णय‎साेमवारी झालेल्या कालवा समितीच्या‎बैठकीत घेण्यात आला. गतवर्षीच्या‎तुलनेत रब्बी पीकांसाठी एक तर उन्हाळी‎पीकांसाठी तीन आवर्तने अधिक देण्यात‎येणार आहे. रब्बी हंगामाच्या पाणी‎पाळीस मंगळवारी सुरुवात होईल असे‎कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी‎सांगितले. यामुळे मराठवाड्यातील 1‎लाख 41 हजार 640 हेक्टरवरील सिंचन‎क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सध्या‎जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शंभर‎टक्के आहे. रब्बी हंगामासाठी‎धरणातून सिंचनासाठी प्रथम सिंचन‎पाणी पाळीसाठी मंगळवारी पैठण‎डाव्या कालव्यामध्ये 200 क्युसेक‎वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे.‎मराठवाड्यातील शेतीला यंदा दोन्ही‎कालव्यातून रब्बीसाठी तीन, तर‎उन्हाळी पिकांसाठी चार पाणी पाळ्या‎देण्यात येणार आहेत.‎ जरांगे फॅक्टर कधीच नव्हता - वाघमारे‎ जालना‎ - लोकसभा निवडणुकीत मुस्लिम-दलित‎मतदारांनी महायुतीचा पराभव केला‎तेव्हाही जरांगे फॅक्टर नव्हता, आताही‎जरांगे फॅक्टर नाही. जरांगे समर्थक काही‎चार-दोन लोक उगीच असे चित्र निर्माण‎करीत आहेत, असा दावा ओबीसी नेते‎नवनाथ वाघमारे यांनी केला. ते जालना‎येथे माध्यमांशी बोलत होते.‎ या वेळी वाघमारे म्हणाले, विधानसभा‎निवडणुकीत जातीयवादी आमदारांना‎ओबीसींनी घरचा रस्ता दाखवला. शिवाय‎शरद पवारांनी जे उमेदवार दिले होते‎त्यांनाही ओबीसींनी घरी बसवले.‎महायुतीला हे यश देवेंद्र फडणवीस, छगन‎भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे‎यांच्यामुळे मिळाले आहे. राज्यात 54 ते 60‎टक्के ओबीसी समाज असून हा समाज‎पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी उभा राहिला‎असा दावा वाघमारे यांनी केला. जरांगे‎उगीच ऊर बडवून सर्व आमचेच आहे असे‎म्हणत आहेत. सोबत असणाऱ्या‎सहकाऱ्यांना तीन हजारांच्या वर मते‎मिळाली नाहीत त्यामुळे जरांगेंच्या या‎निव्वळ वल्गना आहेत. त्यावर कुणीही‎विश्वास ठेवू नये, हे यश महायुतीचे आहे‎असेही वाघमारे म्हणाले.‎ मसापच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा‎कौतिकराव ठाले पाटील यांची निवड‎ छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा साहित्य परिषदेच्या‎‎कार्यकारी मंडळाची बैठक, ना. गो.‎‎नांदापूरकर सभागृहात पार पडली.‎‎कार्यकारी मंडळाची नुकतिच‎‎निवडणूक झाली आहे. कार्यकारी‎‎मंडळ सदस्यांनी एकमताने‎‎कौतिकराव ठाले पाटील यांची‎अध्यक्षपदी निवड केली. त्यांची सहाव्यांदा अध्यक्षपदी‎निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके आणि‎आसाराम लोमटे यांची यांची निवड झाली. कोषाध्यक्ष,‎सहसचिव आणि सदस्यांचीही निवड केली आहे.‎​​​​​​​ दोन दिवसांत दादाराव केचे यांचा संन्यास मागे वर्धा - माजी आमदार दादाराव केचे यांची उमेदवारी डावलून सुमीत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. नाराजीचा सूर असताना आर्वी मतदार संघात राजकीय नाट्य रंगले होते. पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप करून केचेंची नाराजी दूर केली.आमदारांच्या प्रचाराला मोठ्या जोमाने सुरुवात केली तर कुठल्याही प्रकारचे काम केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने केचे यांनी राजकीय संन्यास घेत आहे, असा गाजावाजा केला होता. मात्र, आता दोन दिवसांतच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजकीय संन्यासाला विराम देतो, असे केचे यांनी कार्यकर्त्यांचा मेळाव्यात सांगितले. पुणे महापालिकेचे माजी महापौर उल्हास बाळकृष्ण ढोले पाटील यांचे निधन पुणे - पुणे महापालिकेचे माजी महापौर उल्हास बाळकृष्ण ढोले पाटील यांचे सोमवारी निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ढोले पाटील हे एक प्रसिद्ध व्यापारी होते. काही दशकांपूर्वी उल्हास ढोले पाटील आणि त्यांच्या पत्नी कमल ढोले पाटील यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. मित्राच्या आग्रहावरून उल्हास ढोले पाटील यांनी 1974 मध्ये अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक लढवून ते निवडूनही आले होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article