सामजिक कार्यकर्ते तथा कोकणप्रेमी भाई पानवडीकर यांच्या पुढाकाराने कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून डोंबिवलीत जत्रा भरवली आहे.(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
:
26 Nov 2024, 5:10 am
Updated on
:
26 Nov 2024, 5:10 am
डोंबिवली : सामजिक कार्यकर्ते तथा कोकणप्रेमी भाई पानवडीकर यांच्या पुढाकाराने कोकण एकता प्रतिष्ठान माध्यमातून डोंबिवलीत जत्रा भरवली आहे. ही जत्रा बच्चे कंपनीसाठी पर्वणीच ठरली आहे. कोकणचा स्वाद, नाद, नाती आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 14 वर्षांपासून जत्रा वजा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकांसह बच्चे कंपनीने आवर्जून हजेरी लावली होती.
मुला-बाळांसह अनेक कुटुंबीय कुटूंब जत्रेचा आनंद घेत आहेत.(छाया : बजरंग वाळुंज)
मुला-बाळांसह अनेक कुटुंबीय कुटूंब जत्रेचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तर खवय्यांसाठी ही जत्रा मेजवानी ठरत आहे. दशावतार नाटक, मॅजीक शो, लावणी नृत्य, स्थानिक कलाकारांचे नुत्याविष्कार अशी रेलचेल या जत्रेत सुरू असून ही जत्रा पश्चिमेकडील रेल्वे ग्राऊंडवर 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे कोकण एकता प्रतिष्ठानचे भाई पानवडीकर यांनी सांगितले. स्थानीक कलाकारांना स्वतःची कला सादर करता यावी याकरिता व्यासपीठ दिले जात आहे. कोकणाचीओळख असलेले दशावतार नाटक आणि डबलवारी भजन सामना हे या महोत्सवातील वैशिष्ट्य आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी चाकरमानी आवर्जून उपस्थित राहत आहेत. या शिवाय महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आणि उतुंग झोपाळे मुलांबरोबर मोठ्यांना खुणवत आहेत. दोन आठवडे तरी या उत्सवात सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येईल असे भाई पानवडीकर यांनी सांगितले.