मनपाचे पाणी 8 दिवसांतून एकदाच:शुद्धतेच्या चाचण्या न केलेले जारचे पाणी पिण्याची संभाजीनगरकरांना ‘शिक्षा’
2 hours ago
1
महानगरपालिका ८ दिवसांआड पाणी पुरवत असल्याने छत्रपती संभाजीनगरातील सुमारे ५ लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत घेण्याची वेळ आली आहे. मात्र, जारमधील थंडगार पाणी शुद्धच असेल याची खात्री नाही. कारण त्याच्या शुद्धतेच्या कोणत्याच चाचण्या होत नाहीत. भारतीय मानके ब्यूरोच्या (बीआयएस) २००५ च्या व्याख्येप्रमाणे सीलबंद झाकणाच्या पाण्याच्या बाटल्या आणि जारच पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर प्रकारात मोडतात. हे उद्योगच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) अखत्यारीत येतात. या व्याख्येतून वाचण्यासाठी सीलबंदऐवजी पुनर्वापर करण्याजोगे झाकण असणाऱ्या कूल जारचे व्यवसाय सुरू झाले. व्याख्येत बसत नसल्याने छत्रपती संभाजीनगरातील ३५० ते ४०० तर राज्यातील ५५,००० हून अधिक उद्योग एफडीएच्या बडग्याबाहेर आहेत. जलजीवन मिशनच्या संकेतस्थळाप्रमाणे राज्यातील १४.६ कोटी पैकी १०.१८ कोटी नागरिकांना घरात नळाद्वारे पाणी मिळते. उर्वरित सुमारे ३.५ कोटी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाण किंवा जारवर अवलंबून राहावे लागते. विशेषत: ग्रामीण आणि नवीन वस्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची पाणीपुरवठा योजना पोहोचली नसल्याने कूल जारचा वापर होतो. मात्र, शुद्ध पाण्यासाठी वापरले जाणारे जारचे पाणीच संशयाच्या घेऱ्यात आहे. ५०,००० वर बेकायदेशीर प्लँट एफडीएच्या नोंदीनुसार पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे छत्रपती संभाजीनगरात २२ तर राज्यात ६८७ परवानाधारक व्यवसाय आहेत. महाराष्ट्र पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर संघटनेच्या माहितीनुसार राज्यात ही संख्या ५००० च्या घरात आहे. याव्यतिरिक्त विनापरवाना चालणारे संभाजीनगरात ६००-७०० तर राज्यात ५०,०००-५५,००० कूल जार म्हणजेच आरओ प्लँट आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने २०१९ मध्ये दिलेल्या निर्णयात आरओ प्लँटकरिता लागणाऱ्या पाण्याच्या उपशासाठी केंद्रीय जल बोर्डाची परवानगी बंधनकारक केली. सर्वाेच्च न्यायालयाने मात्र दररोज १०,००० लिटरपर्यंतच्या उपशासाठी परवानगीची गरज नसल्याचा निर्णय दिला. प्रत्यक्षात उपशाची शहानिशा करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. नियमाने कराल तर अधिक बंधने
६४ चाचण्या : बाटलीबंद पाण्याच्या प्रकल्पात अंतर्गत प्रयोगशाळा उभारणे तसेच दरमहा शासनाच्या प्रयोगशाळेत पाण्याच्या गुणवत्तेसंबंधी ६४ प्रकारच्या चाचण्या बंधनकारक. आमच्या अखत्यारीत नाही
कूल जार हे बाटलीबंद पाण्याच्या व्याख्येत बसत नसल्याने आमच्या अखत्यारीत येत नाहीत. अशा प्रकल्पांवर कारवाईचे अधिकार आम्हाला नाहीत. -अजित मैत्रे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व्याख्या बदलण्याची गरज पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची व्याख्या तयार झाली त्या वेळी कूल जार फार उपयोगात नसल्याने त्यांची व्याख्या झाली नाही. आता बाटलीबंद व कूल जारसाठी स्वतंत्र नियमावलीची गरज आहे. -विजय डुब्बल, अध्यक्ष, बाटलीबंद पाणी व्यावसायिक संघटना
उत्पादकाचे नाव, पत्ता, बॅच नंबर, एफएसएसएआय कोड असावा
जारवर छापलेली मॅन्युफॅक्चरिंग व एक्स्पायरी डेट तपासावी
झाकण २ थरांचे असून ते ओढून काढल्यावर तुटायला हवे. पुनर्वापर करणे अशक्य
“प्रक्रिया करून भरलेले पाण्याचे जार, कूल जार, तोटीच्या जारला घट्ट, अभेद्य प्लास्टिकचे सीलबंद झाकण असेल तर ते पॅकेज्ड ड्रिंकिंग वाॅटर ठरते. झाकण उघडण्यासाठी सील तोडावे लागते. ते पुन्हा बसवता येत नाही.’ ही आहेत ४ कारणे 1. बीएसआयच्या व्याख्येमुळे कूल जार ठरत नाहीत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर
2. म्हणून एफडीएच्या अधिकाऱ्यांना कारवाई करणे शक्यच होत नाही
3. शुद्धतेसाठी १२ प्रक्रिया, ६४ चाचण्या, १८ परवानग्या, जारसाठी एकही नाही
4. गुणवत्तेवर वचक नसल्याने आरोग्य धोक्यात, जलजन्य आजारांची शक्यता बीआयएसच्या जानेवारी २००५ च्या व्याख्येनुसार
असे ओळखा नियमानुसार प्रक्रिया केलेले जार १२ प्रक्रिया : १० ते १२ प्रक्रिया करून बाटलीबंद पाणी तयार केले जाते. पण कूल जारमध्ये पाणी स्टोअरेजपासून थेट आरओत जाते. ते नियमात नसताना थंड करून भरतात. १८ परवानग्या, नोंदण्या
बाटलीबंद पाण्यासाठी १८ ते २० विविध खात्यांच्या परवानग्या लागतात. कूल जारसाठी कोणताच नियम नाही. बीआयएसचा नियमही शिथिल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)