Nagraj Manjule: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिलेत. चाहत्यांमध्ये देखील नागराज मंजुळे यांची फार मोठी क्रेझ आहे. एका पाठोपाठ एक हीट सिनेमे देणारे नागराज मंजुळे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या सिनेमाची कथा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी केलं आहे.
दरम्यान, सिनेमाच्या कथेवरून वाद सुरु असताना संजय दुधाणे यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. सिनेमाच्या निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई आणि ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अॅड. रविंद्र शिंदे व अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे.
याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि ज्योती देशपांडे यांना पाठवलं आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.