वर्धा (Wardha):- वर्धा शहरातील बॅचलर रोडवर असलेल्या एस. मार्ट किराणा मालाच्या दुकानासह गोडाऊन मध्ये ठेवलेल्या टायरच्या दुकानाला आग लागली. ही घटना सकाळी आठ वाजता लक्षात आली. तीन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळवणे सुरू होते. पोलिसांना (police)मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करावा लागला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली.
गोडाऊन मधील टायरच्या दुकानामुळे आगीने रुद्र रूप धारण केले
आग (Fire)नियंत्रण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या दुकानाच्या बाजूला बॅटरीचे दुकान आहे तेथील सर्व बॅटर्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढल्या. दुकानाच्या आत मध्ये सिलेंडर होते ते सुद्धा पोलिसांनी बाहेर काढले.वर्धा, देवळी भुगाव च्या इनोविथ कंपनीतून अग्निशामनाचे बंब बोलवण्यात आले. आग विजवल्यानंतर सुद्धा काही वेळाने पुन्हा धूर येणे सुरूच होते. सकाळी आठ वाजता गोडाऊन (Godown) मधून टायर जळण्याचा वास यायला लागल्यामुळे नागरिकांनी ओरड केली. काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या घेऊन पोहोचल्या. तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले होते.आग कशामुळे लागली हे अद्यापही कळाले नाही. आगीचा धूर इतक्यता जास्त प्रमाणात होता कि तेथे राहणाऱ्या नागरिकांच्य घरी धूर मोठ्या प्रमाणात जात होता, त्यामुळे तेथील लोकांना घरून बाहेर काढण्यात आले. दुकानाच्या खाली भागात टायर(tyre), ऑइल, किराणा मालाच्या दुकानांमध्ये तेलाचे पिपे असल्याने आग आटोक्यात आणण्याकरिता काही वेळ अजून लागू शकतो असे वर्धा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पराग पोटे यांनी सांगितले.
गोडाऊन मध्ये टायर असल्याने आज थोड्या थोड्या वेळाने वाढत होती. यापूर्वी शहरात वर्धा पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या एका टायरच्या दुकानाला आग लागली होती.