मानोरा(Washim):- केंद्र सरकारने (Central Govt)पिएम किसान योजनेची नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास आता यापुढे कुटुंबातील एकालाच लाभ घेता येणार आहे. या लाभासाठी अर्ज करताना कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्याच बरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९ पुर्वी जमीन खरेदी केली आहे. त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आयकर भरणारे पेंशनर्स यांना यापुढे पि एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्जासोबत प्रत्येकाचे आधार कार्ड जोडणे आवश्यक
सन २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पि एम किसान योजना सुरू केली. वर्षाला ६००० रूपये २००० रुपायाप्रमाने देण्याचे जाहीर केले. आता नियमावलीमध्ये बदल करण्यात आला असून यापुढे कुटुंबातील एका व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र अर्ज करताना कुटुंबातील सर्वांना आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.