मानोरा (Washim) :-आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या माध्यमातून कौशल्य आत्मसात करून त्यामधून रोजगार मिळवावा, असे आव्हान आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी केले. ते महाविद्यालय व व्हॉईस ऑफ मिडिया(Voice of Media) मानोरा तालुका पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक आपल्या भेटीला सत्कार समारंभ करिअर कट्टा मार्गदर्शन कार्यक्रमात मा. सु. पा. महाविद्यालयात दि. ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना बोलत होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या माध्यमातून कौशल्य आत्मसात करून त्यामधून रोजगार मिळवावा, असे आव्हान
यावेळी युवा उद्योजक अक्षय जाधव, कोमलसिंग राठोड व करिअर मार्गदर्शक कु. राजश्री आडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव महादेवराव ठाकरे, प्राचार्य डॉ नंदकिशोर ठाकरे, व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, तालुकाध्यक्ष वसंत राठोड आदींची उपस्थिती होती. पुढे अरविंद पाटील म्हणाले की, स्वतःचा छोटे मोठे व्यवसाय करणारेही सुखी जीवन जगत आहे. आपल्यातील टॅलेंट, जिद्द व चिकाटीने कोणतेही काम केल्यास त्यात यश मिळते. त्याचप्रमाणे आगामी काळात १० वी १२ विच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त होणे गरजेचे असल्याचे सांगत व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघाने व महाविद्यालयाने विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष भागवत मापारी यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कार मुर्ती युवा उद्योजक अक्षय जाधव व कोमलसिंग राठोड यांनी आपले करिअर स्वतः घडवत असताना आलेल्या अनेक अडचणीचा उहापोह केला.
यावेळी करिअर मार्गदर्शक कु. राजश्री आडे यांनी विद्यार्थ्यांशी (Students)संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य डॉ नंदकिशोर ठाकरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार कसे मिळवावे आणि त्यासाठी विद्यार्थ्यानी आपल्या कला गुणांचा उपयोग कसा करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी पत्रकार अनिल राठोड, बबन देशमुख, राजु ठाकरे, योगेश देशमुख, गोविंद हेडा, निखिल वानखडे, विशाल मोरे आदीसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मंडळी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. संचालन डॉ अविनाश निळे यांनी केले तर आभार प्रा. निखिल भगत यांनी मानले.