मानोरा (Washim) :- मंजूर रस्त्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून(Public Works Department) काम सुरू करण्यास दिरंगाई होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात स्वातंत्र्यदिनी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदार डॉ . यावलीकर यांना परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी दिले आहे.
रस्त्याची अत्यंत दुरावस्था
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, देऊरवाडी, चिखली, धानोरा व शिवनी रतनवाडी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर निधी मंजूर असल्याने सदर काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या सदस्या सौ छाया राठोड यांनी त्याच रस्त्यावर आंदोलन केल्याने आंदोलना दरम्यान सदर रस्त्याचे काम आठ दिवसात सुरू करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता यांनी दिले होते. आज घडीला या आश्वासनाला वर्षभराचा कालावधी उलटूनही सदर रस्ता जैसे थे असल्याने गणतंत्र दिनी २६ जानेवारी बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे.
सतत निवेदन स्मरणपत्रे देऊनही झोपेचे सोंग घेणाऱ्या बांधकाम प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल नाही
मागील वर्षी या दोन्ही रस्त्याच्या बांधकामास परवानगी देऊन टेंडर ही काढण्यात आले परंतु भ्रष्ट प्रवृत्तीच्या बांधकाम विभागातील झरीच्या शुक्राचार्याच्या दुर्लक्षित धोरणापायी या खड्ड्यामय रस्त्यावरून वाहने तर सोडाच परंतु त्या रस्त्यावरून पायदळ चालणेही कठीण झाले आहे. देऊरवाडी, चिखली, धानोरा व शिवनी आमदरी या दोन्ही रस्त्याची तातडीने खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी परिवर्तन शेतकरी (Farmer)संघटनेच्या वतीने सतत निवेदन स्मरणपत्रे देऊनही झोपेचे सोंग घेणाऱ्या बांधकाम प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल नाही. चिखली देवरवाडी या रस्त्यावरून २० गावाच्या नागरिकांना रोज तालुक्याच्या ठिकाणी ये जा करावी लागते तर शिवनी रतनवाडी हा रस्ता दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्सा आहे.
तेव्हा या दोन्ही रस्त्याची परिस्थिती गंभीर आहे. तेंव्हा मंजूर सदरील रस्त्याच्या कामाला २६ जानेवारी रोजी उपविभागीय बांधकाम कार्यालयात ठिय्या आंदोलन इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी वंचितचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय रामटेके, मारुती पारधी व पंढरीनाथ खापरे आदी उपस्थित होते.