रिसोड(Washim):- तालुक्यातील चिखली येथील सरपंच सौ.मनिषा रमेश अंभोरे यांचे पती रमेश श्रीराम अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदार, पोलिस प्रशासणाद्वारे मुख्यमंत्री कार्यालयाला लेखी निवेदन दिले आहे.
सरपंच संघटनेचे तालुका प्रशासनाद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन
तालुक्यातील सरपंच संघटनेच्या माध्यमातून पंचायत समिती सभागृह येथे दिनांक २०/०१/२०२५ रोजी सभा झाली सदर सभेमध्ये ग्रामपंचायत चिखली ता.रिसोड जि.वाशिम येथील सरपंच सौ. मनिषा रमेश अंभोरे यांचे पती रमेश श्रीराम अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला सदर हल्ल्यात सरपंच यांचे पती रमेश श्रीराम अंभोरे हे गंभीर जखमी झाले. तसेच सरपंच यांनी गावातील दारू, मटका, जुगार यासारखे अनेक अवैध धंदे (Illegal business) बंद केल्यामुळे सरपंच यांचे पती रमेश श्रीराम अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला (Assault) करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरील कुटुबियांच्या जीवित्वास धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील इतर सरपंचामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रामध्ये सरपंचावर हल्ले होण्याचे प्रमाण खुप वाढले आहे. यावर तात्काळ उपाय करीत हल्लेखोरावर चौकशी अंती कठोर कारवाई ची मागणी केली आहे.सदर निवेदनावर रिसोड तालुका सरपंच संघटनेतील पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या आहेत.