मनपा, जि.प., पं.स., न.प. च्या निवडणुका प्रलंबीत
परभणी (Zilha parishad Election) : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. आता इच्छुकांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीकडे लागले आहे. परभणी (Zilha parishad Election) मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका मागील अडीच वर्षापासून प्रलंबीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांनची मुदत संपुन दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. नगरसेवक बनण्याच्या आशेने काही जण कामाला लागले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका रेंगाळल्या. (Zilha parishad Election) जिल्हा परिषद, पंचायत समिती, परभणी महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनचा कालावधी संपुन दोन वर्षापेक्षा अधिक वेळ झाला आहे. या निवडणुका होणे अपेक्षीत होते. मात्र निवडणुका झाल्या नाही. निवडणुकीसाठी प्रभाग रचना, सदस्य संख्येची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात निवडणुकांना मुहूर्त लागला नाही. ओबीसी आरक्षण व इतर कारणांमुळे निवडणुका रेंगाळल्या.
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता इच्छुकांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लागले आहे. मात्र या (Zilha parishad Election) निवडणुका होण्यासाठी २०२५ चे वर्ष उजाडेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका होतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांमधुन व्यक्त केला जात आहे. इच्छुक मात्र पायाला बाशिंग बांधुन स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत.