झोमॅटोकडून नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क लावले जातात. त्याची चर्चा सोशल मीडियातून होत असते. आता झोमॅटोने पुन्हा एक सर्वात वेगळे शुल्क बिलासोबत लावले. त्यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यानंतर झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांना माफी मागावी लागली. कंपनीच्या सीईओने ते शुल्क पाहिल्यानंतर म्हटले, आमच्याकडून ही चूक झाली आहे. यापुढे असे होणार नाही.
कोणत्या प्रकारचे लावले शुल्क?
रोहित रंजन नावाच्या एका युजरने लिंक्डइन पोस्ट केली. त्यात त्यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केले. त्यांनी म्हटले शाकाहारी पदार्थांवर ‘Veg Mode Enablement Fee’ नावाचा एक वेगळेच शुल्क लावण्यात आले. त्यांनी पोस्टमध्ये शाकाहारी लोकांवर लावण्यात आलेला हा लग्झरी टॅक्स असल्याचे म्हटले.
रोहित रंजन यांनी म्हटले की, भारतात शाकाहारी होणे एक अभिशाप आहे. त्यात म्हटले की, व्हेजेटेरियन सहकाऱ्यांनी स्वत:ला सांभाळून घ्यावे. आम्ही ‘ग्रीन एंड हेल्दी’ वरुन आता ‘ग्रीन आणि प्राइसी’ झाला आहोत. धन्यवाद झोमॅटो. यासाठी धन्यवाद की शाकाहारी असणे हा लग्झरी टॅक्स तुम्ही केला आहे. परंतु आमच्यासोबत सारखा व्यवहार करणाऱ्या स्विगीचे आभार, असे पोस्ट रंजन यांनी केली. झोमॅटोकडून व्हेज मोड म्हणून 2 रुपये शुल्क घेतले जात होते.
हे सुद्धा वाचा
यानंतर झोमॅटोच्या सीईओने लिहिले की, ‘हा आमच्याकडून हा मूर्खपणा झाला आहे. या बाबत मला खूप खेद वाटतो. हे शुल्क आजच काढले जाणार आहे. तसेच या पुढे ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही बदल करू, असे आश्वासनही गोयल यांनी दिले. आमची चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
झोमॅटो आपल्या प्लॅटफॉर्मवर लावत असलेल्या विविध करांमुळे चर्चेत असतो. नुकतेच झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्मवरील विविध शुल्कात वाढ केली आहे. तसेच अनेकदा वेगवेगळे सरचार्ज ग्राहकांकडून वसूल केले जातात.