ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचे स्वतःचे महत्त्व आहे. त्या दृष्टीने जन्मतारखेलाही विशेष महत्वाचे मानले जाते. खरं तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टीपासून सावकाराला नाही पाहिजे या सर्वांची त्याची माहिती राशी आणि जन्मतारखेच्या माध्यमातून काढली जाते. एखाद्याच्या आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल जाणून घेणे किंवा कुंडली जुळविणे. यामध्ये राशीव्यतिरिक्त जन्मतारीख महत्त्वाची भूमिका बजावते.
अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे, ज्यामध्ये जन्मतारखेच्या आकड्यांची माहिती सविस्तरपणे उल्लेख केलेला आहे. ज्योतिषशास्त्रात ज्या प्रकारे प्रत्येक १२ राशींचा उल्लेख आढळतो. त्या १२ राशीपाहून तुम्ही एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, जीवन आणि भविष्य जाणून घेऊ शकतो. अशा प्रकारे अंकशास्त्रातील जन्मतारखेच्या अंकांमधून मिळणाऱ्या मूलांकाची माहिती सविस्तर दिली आहे. अशाच कोणत्या ३ तारखा आहेत त्या जाणूनन घेऊयात.
हे सुद्धा वाचा
जन्मांक ६
कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूल्यांक ६ येतो. ज्यांचा मूलांक ६ आहे त्या मुलींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो आणि त्या अतिशय सुंदर असतात. तसेच कुटुंबासाठी भाग्यवान मानले जातात.
महिन्याच्या ६, १५, व २४ या 3 तारखेला जन्मलेल्या मुली खूप सुंदर असतात. त्यांच्या सौंदर्यासमोर उभं राहणं कुणालाही कठीण होऊन जातं. कारण यामुळे दिसायला खूप सुंदर असतात. अनेकदा लोक त्यांच्या सौंदर्याने प्रभावित होतात. तर या मुलींचे अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व असते.
कुटुंबासाठी भाग्यवान असतात
ज्या घरांमध्ये या ३ तारखांना मुलींचा जन्म होतो त्या घरातील लोकं खूप नशीबवान असतात. या मुली त्यांच्यासोबत सौभाग्य घेऊन येतात आणि घरातील सदस्यांचे आयुष्य बदलून टाकतात. तसेच लग्नानंतर या मुली ज्या घरात जातात त्या घरातील लोकांची बरीच प्रगती होते.
या मुलींचा स्वभाव कसा असतो?
६, १५, व २४ या 3 तारखेला जन्मलेल्या मुलींचा स्वभाव अतिशय साधा आणि सोपा असतो. त्यांचं व्यक्तिमत्त्व जितकं सुंदर आहे, तितकंच वागणंही सुंदर आहे. इतरांना मदत करण्यास त्या कधीच मागेपुढे पाहत नाही.
प्रत्येक कामात यशप्राप्ती
शुक्राच्या प्रभावामुळे या मुली अतिशय हुशार असतात आणि आयुष्यात भरपूर यश मिळवतात. त्यांचे नशीब इतके चांगले असते की त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला त्यांना यश मिळते. तसेच त्यांचा आत्मविश्वास इतका मजबूत असतो की आयुष्यात ते नक्कीच यशस्वी होत होतील, असा त्यांचा स्वत:वर विश्वास असतो.
पैशांची बरकत
शुक्र ग्रह व्यक्तीला धन, संपत्ती, सुख, समृद्धी, ऐश्वर्य देण्याचे काम करतो. हेच कारण आहे की ज्या घरात या मुली राहतात त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. अशा घरांमध्ये पैशांचा साठा नेहमीच भरलेला असतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)