अकोल्यातील जलाशयांना पाणपक्ष्यांची प्रतीक्षा:थंडी उशीरा पडल्याने आतुरता वाढली; स्थानिक पक्ष्यांचे स्थलांतर सुरू
16 hours ago
1
"नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे दरवर्षी पक्षिमित्रांना उत्सुकता असते ती हजारो किमीचा प्रवास हवाई मार्गे करून आपल्या परिसरातील पाणवठ्यांवर येणाऱ्या रंगीबेरंगी, स्थलांतरीत पक्ष्यांची. मात्र, यंदा उशीरा थंडी पडल्यामुळे पक्षीप्रेमींना विदेशी पक्ष्यांच्या निरीक्षणाची आतुरता आहे. दरवर्षी चिमणी एवढ्या असणाऱ्या धोबी पक्षापासून ते उंच व देखण्या करकोचाची, बदकाची, शिकारी पक्षांची, झुडपी खगांची भेट हिवाळ्यात अनेक पाणवठ्यांवर होते. विविध तऱ्हेचे हे पक्षी भारतभर पसरतात. त्यांना जेथे अनुकूल प्रदेश आढळतो तेथे ते विसावतात, पोटपूजेसाठी सर्वदूर विखुरतात. निसर्गाने त्यांना विविधतेने नटवलेले असतेच त्यामुळे त्यांना न्याहाळणे, अनेकविध रंगांची पिसे लेऊन ही पक्षी संपदा पक्षी मित्रांना भुरळ घालते. आणि पक्षी वेडे हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत पंचक्रोशीतील पाणवठे पालथे घालत असतात. अनेक जलाशयावर हिवाळ्यात हे पक्षी दरवर्षी हजेरी लावतात. यावर्षी ही पक्षी अकोला शहरातील पक्षांच्या आवडत्या ठिकाणांना, आजूबाजूच्या पाणवठ्यांना भेटी देत आहेत. पण अद्याप स्थलांतरीत पाहुण्यांचे आगमन झालेले नाही. त्यामुळे ह्या पाणवठ्यांनाही पक्ष्यांची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान काही झुडुपी स्थलांतरीत पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. त्याबरोबर स्थानिक पक्षांना न्याहाळणे हा आनंदसोहळा पक्षी मित्रांना सुखावतो आहे. अकोल्यात येथे दिसतात विविध प्रजातींचे पक्षी कुंभारी जलाशय, कापशी तलाव, आखातवाडा, मोर्णा धरण, चेल्का पाणवठ्यांवर स्थलांतरी पक्षांचा वावर असतो. येथे पक्षीप्रेमींनी भेटी. मात्र, स्थलांतरीत पक्षांनी अद्याप हजेरी लावलेली नाही. पक्षीमित्र दीपक जोशी, डॉ. अतुल मुंदडा, डॉ. सतीश पडघन, नीलेश पडघन, श्रीकांत वांगे, सुभाष पडघन, अनुल मनवर ह्यांच्या चमूकडून अकोल्यातील विविध तलावांवर भेटी देऊन याबाबत काम करण्यात येत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)