बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या लग्नाची किंवा अफेअरची जेवढी चर्चा होत नाही तेवढी त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होताना दिसते. दरम्यान असेही काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाच्या 40 ते 50 व्या वर्षी घटस्फोट घेतला आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जिने वयाच्या 42 व्या वर्षी लग्न केलं तर 50 व्या वर्षी घटस्फोट घेतला. ती अभिनेत्री म्हणजे रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर.
आयुष्यातही अनेक संकटांना सामोरं जावं लागलं
आज 4 फेब्रुवारी रोजी आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. उर्मिलाने तिच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट आणि मालिकांमधून प्रसिद्ध झालेली उर्मिला मातोंडकर तिच्या पर्सनल लाईफमुळे अनेकदा चर्चेत असते.
तिला तिच्या फिल्मी आयुष्यासोबतच खासगी आयुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. मग ते राजकारण असो किंवा मग तिचं फिल्मी करिअरमध्ये आलेला मोठा ड्रॉबॅक असो. तिने नेहमी याबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे.
उर्मिलाची चर्चा जास्त रंगली घटस्फोटामुळे
उर्मिला मातोंडकरची चर्चा जास्त रंगली ती तिच्या घटस्फोटाच्या बातमी मुळे. उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर यांनी 2016 मध्ये लग्न केलं. त्यांची लव्हस्टोरी अत्यंत हटके आहे. मुळात उर्मिला मातोंडकरने 42 व्या वर्षी मोहसिनशी विवाहबंधनात अडकली. दोघांनीही आतंरजातीय विवाह केला. मात्र 8 वर्षांनी दोघेही वेगळे झाले.
उर्मिला आणि मोहसीन यांची भेट कशी झाली?
उर्मिला आणि मोहसीन यांची भेट दोघांचाही कॉमन फ्रेंड बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यामुळे झाली. मनीष मल्होत्राची भाची रिद्धीच्या लग्नात उर्मिला आणि मोहसीन हे दोघे एकमेकांना भेटले. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरूवातीला दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते.
यानंतर या दोघांच्या भेटी वाढल्या. काही दिवसांनी मोहसीनने उर्मिलाला लग्नासाठी प्रपोज केले पण उर्मिलाला हे मान्य नव्हते. 1 वर्ष मोहसिनने उर्मिलाशी बोलण्याचा प्रयत्न केला मोहसीन उर्मिलाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. यानंतर उर्मिलाने होकार दिला.
42 व्या वर्षी मोहसिनशी विवाहबंधनात अडकली होती
एकमेकांवर अपार प्रेम करणारे उर्मिला आणि मोहसिन यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला. मात्र लग्नाचा विचार केल्यानंतर या दोघांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. मोहसिन हा उर्मिला पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. मात्र उर्मिलाने वय आणि धर्माचा कोणताही विचार न करता वयाच्या 42 व्या वर्षी मोहसिनशी विवाहबंधनात अडकली.
लग्नाच्या आठ वर्षानंतर घटस्फोट
हिंदू आणि इस्लाम या दोन्ही पद्धतीनुसार उर्मिला-मोहसिनने लग्न केलं. 2016 मध्ये अत्यंत कमी लोकांमध्ये कुटुंबियांच्या उपस्थित या दोघांनी लग्न केलं. इंडस्ट्रीतून केवळ मनिष मल्होत्रा या लग्नात उपस्थित होता. उर्मिलाने मोहसिनच्या प्रेमासाठी धर्म आणि वयाचे बंधन झुगारून लग्न केलं होतं. उर्मिलाने लग्नाच्या आठ वर्षानंतर पती मोहसीन अख्तरशी घटस्फोट घेतला. सप्टेंबरमध्ये या दोघांनीही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला.
उर्मिला मातोंडकरने घटस्फोट का घेतला?
जर मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्मिला मातोंडकरशी संबंधित सूत्राने माहिती दिली आहे की उर्मिलाला तिच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकरने पती मोहसिनपासून खूप विचार करून आणि समजून घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या घटस्फोटामागचे नक्की कारण अद्याप समोर आलेले नाही.