पिचक्या पाठकण्याचे व स्वाभिमानाची जाण नसलेले लोक मोदी समर्थक म्हणून निवडून आले. ते महाराष्ट्रावरील संकटाशी सामना कसा करतील? असा गंभीर सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला.
उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी
Samana Editorial On Maharashtra Election Result : मोदी-शहा-फडणवीस यांनी महाराष्ट्रात दुहीची बीजे पेरली, जाती-धर्मात दरी पाडली, मत विभागणीसाठी छोटय़ा पक्षांना सुपाऱ्या देऊन आपले काम साधले. हाच भाजप विजयाचा ‘फॉर्म्युला’ म्हणता येईल. जोडीला प्रचंड पैसा व सरकारी यंत्रणा असल्याने विजयाच्या मार्गावरील खड्डे दूर झाले. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, आडाम मास्तर, कॉ. जिवा पांडू गावीत, वैभव नाईक, राजन साळवी यांच्यासारखे लोकाभिमुख उमेदवार व नेते पडतात आणि अनेक ‘थुकरट’ उमेदवार विजयी केले जातात. हे पिचक्या पाठकण्याचे व स्वाभिमानाची जाण नसलेले लोक मोदी समर्थक म्हणून निवडून आले. ते महाराष्ट्रावरील संकटाशी सामना कसा करतील? असा गंभीर सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.