दिल्लीने ठरवलेला मुख्यमंत्री स्वीकारावा लागेल:महाराष्ट्राशी वैर घ्यायचे असल्याने भाजप कोणतीही भूमिका घेऊ शकते - संजय राऊत

2 hours ago 1
मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरेल. भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. त्यांना कुणाकडे हात पसरावे लागणार नाही. भाजपकडे 140 च्या आसपास आमदार आहेत. त्यांच्या मित्रपक्षांकडे 100 आमदार आहेत. त्यामुळे जो मुख्यमंत्री दिल्लीतून ठरेल तो स्वीकारावा लागेल, असे संजय राऊत म्हणाले. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना राऊत म्हणाले, त्यांची युती असल्यामुळे ते ठरवतील. शब्द पाळण्यासंदर्भात भाजपची परंपरा नाही. त्यामुळे महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचे असल्यामुळे ते अशी कोणतीही भूमिका घेऊ शकतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ही बातमी अपडेट करत आहोत...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article