अजमेर दर्ग्यात शिवमंदिराच्या दाव्याची याचिका न्यायालयातfile photo
Published on
:
28 Nov 2024, 3:52 am
Updated on
:
28 Nov 2024, 3:52 am
अजमेर (राजस्थान) : अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या जागेवर पूर्वी संकट मोचन महादेव मंदिर होते. ते पाडून दर्गा उभारण्यात आल्याचा दावा करणारी याचिका अजमेर सिव्हिल कोर्टाने स्वीकारली. याचिका सुनावणीस योग्य असल्याचे न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरून दिवाणी न्यायालयाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, दर्गा कमिटीसह भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे. निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी १९११ मध्ये लिहिलेल्या अजमेरसंदर्भातील पुस्तकाचा हवाला याचिकेत देण्यात आला आहे. दर्ग्याच्या संकुलात शिव मंदिराचे गर्भगृह आणि एक जैन मंदिर असल्याचेही त्यात नमूद आहे. दर्गा परिसराचे 'एएसआय'कडून सर्वेक्षण करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.