अजित पवार यांच्या स्वागताच्या बॅनरने माजलगावात एकाचा बळी

2 hours ago 1

अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरने माजलगावात एकाचा बळी file phto

पुढारी वृत्तसेवा

Published on

03 Oct 2024, 8:43 am

Updated on

03 Oct 2024, 8:43 am

माजलगाव : माजलग येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसामान्य यात्रा स्वागताचे रस्त्यावर पडलेले बॅनर बाजूला करताना विजेच्या तारांचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता घडली. गौतम सरपटे (वय २५) रा. केसापुरी कॅम्प असे मृत तरूणाचे नाव आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसामान्य यात्रा १ ऑक्टोबर रोजी माजलगावात मंगलनाथ मैदानावर घेण्यात आली. यानिमित्त अजित पवार यांच्या स्वागतचे बॅनर माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर लावण्यात आले होते. एक बॅनर माजलगाव धरणाच्या कमानी समोर पडले होते. सदर बॅनर उचलून बाजूला ठेवत असताना विद्युत तारांना स्पर्श झाल्याने गौतम सरपटे याला विजेचा धक्का बसला. ही घटना दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता घडले आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article