अजित पवार यांच्यावर काेणताही अन्याय झालेला नाही:अनेकदा ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले - शरद पवार
1 day ago
2
23 नाेव्हेंबर राेजी राज्यात सत्ता परिवर्तन हाेईल व मतदार यंदा निवडणुकीत आघाडीला साथ देईल. मी काही ज्याेतिष नाही पण आम्हाला बहुमत मिळावे असे वाटते. अजित पवार यांनी 160 नाही तर 270-280 जागा महायुतीच्या निवडून येतील असे सांगितले पाहिजे हाेते असा टाेमणा खा.शरद पवारांनी पत्रकारांशी बाेलताना मारला.ते म्हणाले, अजित पवार यांच्यावर काय अन्याय झाला आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे.अनेकवेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून युगेंद्र पवार तरुण मुलगा असून त्याकडे अद्याप काेणते राजकीय पद नाही, त्यामुळे अन्याय काेणावर व काेणाकडून झाला. सुप्रिया सुळे यांना बारामतीकरांनी चाैथ्यांदा संसदेत पाठवले यातच मला समाधान आहे पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राचे भवितव्य नागरिकांच्या मताचे रुपात आज पार पडत असून मतदान हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. लाेकसभा निवडणुकवेळी राज्याचे मतदान 67 टक्के हाेते तर ईशान्य भारतात छाेटी राज्ये 70-75 टक्क्यापुढे गेली हाेती. राज्याने मतदानात मागे राहणे याेग्य नाही त्यामुळे जनतेला माझे आव्हान की, त्यांना जाे याेग्य उमेदवार वाटताे त्यास मतदान करा. राज्यात नेहमी मतदान शांततेत हाेते. नागपूर येथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला यंदाचा हल्ला अस्वस्थ करणारा हाेता. असे प्रकार राज्यात घडले नाही पाहिजे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकाॅईन घाेटाळा बाबत आराेप झाले त्यासंर्दभात पवार म्हणाले, ज्या माजी आयपीएस अधिकारी व बीटकाॅईन घाेटाळयातील आराेपीने हे आराेप केले ते एक वर्ष कारागृहात राहून आले आहे. त्याची नाेंद घेणे गरजेचे नाही. भाजप व त्यांचा प्रचार हा किती खालच्या पातळीवर गेलेला आहे हे यातून दिसून येत आहे. 23 नाेव्हेंबर राेजी राज्यात सत्ता परिवर्तन हाेईल व मतदार यंदा निवडणुकीत आघाडीला साथ देईल. मी काही ज्याेतिष नाही पण आम्हाला बहुमत मिळावे असे वाटते. महायुतीस सकारात्मक वातावरण राहील राज्यात 288 मतदारसंघात आज मतदान हाेत असून काेणाचे हातात राज्याची सत्ता साेपवयाची याबाबतचा निर्णय राज्यातील जनता घेणार आहे. याेग्य उमेदवारास जनतेने संबंधित मतदारसंघात विजयी करावे आणि देशात राज्याने चांगली घाेडदाैड करावी. माझ्या आईने आधीच मतदान केले आहे कारण 85 वर्षापेक्षा अधिक वय असल्याने तिला घरीच मतदान करण्याचा अधिकार आहे. राज्यात महायुतीचे दृष्टीने सकारात्मक चित्र राहील असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बाेलत हाेते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)