अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणे टाळले, नंतर अर्धा तास चर्चा:पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

3 hours ago 2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गुरुवारी एकाच मंचावर आले होते. या दोघांच्या खुर्च्या एकमेकांशेजारीच लावण्यात आल्या होत्या. ही बाब लक्षात आल्यावर अजित पवारांनी स्वत:च्या खुर्चीसमोरील नावाची पाटी अलीकडे सरकवून आपल्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवण्यास सांगितले. त्यामुळे काका-पुतण्यात दुरावा कायम असल्याचे सर्वांना वाटले. प्रत्यक्षात कार्यक्रम संपल्यानंतर या दोघांनी बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. सभागृहात आगमन होताच आपली खुर्ची शरद पवारांच्या बाजूला असल्याचे अजित पवारांच्या लक्षात आले. त्यांनी काही क्षणात आसनव्यवस्था बदलली. त्याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, बाबासाहेब पाटील यांचे शरद पवार यांच्याकडे काम होते त्यामुळे मी बाजूला बसलो. माझा आवाज मोठा आहे, मी दोन खुर्च्या सोडून बसलेल्या व्यक्तीसोबतही बोलू शकतो. साखर प्रश्नाविषयी चर्चा सभेनंतर शरद पवारांशी बंद दाराआड काय बोलणे झाले, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, सहकार, एक्साइज, कृषी आणि ऊर्जा या सरकारच्या विभागांचा संबंध साखर कारखान्यांशी येतो. त्या संदर्भातील प्रश्नांविषयी मी त्यांच्याशी बोललो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article