Oscars 2025: भारतीय सिनेमा आता नवनवे प्रयोग करत विक्रम रचत आहे. आता गुनीत मोंगा कपूर यांचा लघुपट ‘अनुजा’ ऑस्कर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीसाठी निवडला गेला आहे. त्यामुळे भारतीय सिनेमा पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत दिसणार आहे. ‘अनुजा’ लघुपटाची कथा बालमजुरीच्या गंभीर समस्येवर आधारित असून एक संवेदनशील कथा आहे. जी विशेषतः वस्त्रोद्योगात लहान मुलांचे शोषण कशा प्रकारे होते… ते दाखवण्याच प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे अभिनेते नागेश भोसले सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
नागेश भोसले यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.’आज माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. कारण मी एक शॉर्टफिल्म काम केलं आहे. फिल्मचं नाव अनुजा असं आहे. सिनेमा लहान मुलांचं शिक्षण त्यानंतर बालमजुरीच्या गंभीर प्रश्नाभोवत सिनेमाची कथा फिरताना दिसत आहे.’
‘सिनेमाच्या दिग्दर्शकांनी प्रचंड मेहनत घेतली. दोन्ही मुली ज्यांनी सिनेमात महत्त्वाची कामं केली. दोन्ही मुली इथल्याच आहेत. त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम करुन घेतलं. संपूर्ण टीमने मेहनत घेतलं. त्याचं आता फाळ मिळालं आहे. त्यामुळे सिनेमाला ऑस्कर मिळावा अशी इच्छा व्यक्त करतो…’ असं व्यक्तव्य नागेश भोसले यांनी केली आहे.
सांगायचं झालं तर, गुनीत मोंगा यांच्या तिसऱ्या सिनेमाला ऑस्करच्या यादीत नामांकन मिळालं आहे. ‘द एलीफेंट व्हिस्पर्स’ आणि ‘पीरियड: एंड ऑफ सेंटेंस सिनेमाने ऑक्सर पुरस्कार स्वतःच्या नावावर केला आहे, त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक मान्यता मिळाली आहे.
‘अनुजा’सोबतच ब्रिटिश-भारतीय सिनेमा ‘संतोष’ देखील ऑस्करच्या शर्यतीत आहे. हा सिनेम संध्या सुरी यांनी दिग्दर्शित केला असून युनायटेड किंगडमची अधिकृत एंट्री आहे. या सिनेमात अभिनेत्री अभिनेत्री शहाना गोस्वामी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
ऑस्करच्या यादी सामिल असलेल्या अन्य सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘क्लोडा’, ‘द कम्पॅट्रियट’, ‘क्रस्ट डोवेकोट’, ‘एज ऑफ स्पेस’ आणि ‘द आइस क्रीम मॅन’ हे सिनेमे देखील ऑस्करच्या याजीदीद आहेत.