अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित आणि अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. दरम्यान, या चित्रपटातील एका सीनवर संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विकी कौशल याच्या लेझिम नृत्यावर नाराजी व्यक्त करत संभाजी राजे म्हणाले, ‘छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिमवर नृत्य करताना दिसले आहेत. लेझिम खेळताना दाखविणं चुकीचं नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखविले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा असल्याचे त्यांनी म्हटले. तर छत्रपती संभाजी महाराज याच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक उत्तेकर एक मराठी माणूस आहे त्यांनी खूप मोठं धाडस करून संभाजी महाराजांवर चित्रपट बनवला आहे. त्यामुळे यामध्ये कुठलेही चुका राहू नयेत अशीच आमची ही इच्छा असल्याचे संभाजीराजे म्हणाले. तर ‘चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती, त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट इतिहास अभ्यासकांसोबत दाखवा अशी मी विनंती केली होती. आताही त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना तो चित्रपट दाखवावा, असे म्हणत पुन्हा एकदा विनंती केली आहे.
Published on: Jan 24, 2025 02:08 PM