विरोधी पक्षनेत्यासाठी दीड वर्षांचा फॉर्म्युला?:शरद पवारांचा आग्रह, पण काँग्रेसचा विरोध असल्याचा दावा; दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता

4 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे संख्याबळ मिळाले नाही. त्यामुळे राज्य विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपदाचा अद्याप सुटला नाही. पण आता विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीसाठी विरोधक एक वेगळाच प्रयोग करण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांना या पदाचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येकी दीड वर्षांच्या फॉर्म्युल्यावर विचार केला जात आहे. राज्य विधिमंडळातील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी विरोधी बाकावरील एखाद्या पक्षाकडे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या 10 टक्के सदस्य असण्याची गरज आहे. महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधी बाकावरील एखाद्या पक्षाकडे किमान 29 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. पण महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे एवढे संख्याबळ नाही. सद्यस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 20, काँग्रेसकडे 15, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 10 आमदार आहेत. यापैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक अटीची पूर्तता करत नाही. त्यामुळे आतापर्यंत हे पद रिकामे आहे. शरद पवारांनी ठेवला दीड वर्षांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव सूत्रांच्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना प्रत्येकी दीड वर्षे हे पद देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण काँग्रेसने त्याला विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने हा प्रश्न दोन्ही सभागृहातील संख्याबळाच्या आधारावर सोडवला जावा असा आग्रह धरला आहे. शरद पवारांच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध काँग्रेसच्या मते, संख्याबळानुसार, विधानसभेत ठाकरे गटाचा, तर विधानपरिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असावा काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शरद पवारांनी सूचवलेला दीड वर्षांचा फॉर्म्युला मागे पडला आहे. पण या मुद्यावर दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत एकमेकांशी भेटून या मुद्यावर तोडगा काढतील असा दावा केला जात आहे. हे ही वाचा... कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के:नीलेश राणे यांनी महाविकास आघाडीचा 1 नगरसेवक फोडत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणला सिंधुदुर्ग - कोकणात शिवसेनेच्या ठाकरे गटाला पर्यायाने महाविकास आघाडीला जबर झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी शुक्रवारी कुडाळ नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा 1 नगरसेवक फोडून भाजपच्या प्राजक्त बांदेकर यांची नगराध्यक्षपदी निवडून आणले आहे. या निवडणुकीत मविआच्या उमेदवाराचा एवघ्या 1 मताने पराभव झाला. वाचा सविस्तर भंडाऱ्यात आयुध निर्माण कंपनीत स्फोट:कारखान्याचे छत कोसळल्याने 13 जण ठार झाल्याची भीती; दोघांना वाचवण्यात यश, मदतकार्य सुरू भंडारा - भंडाऱ्यामधील आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. त्यात कंपनीचे छत कोसळल्यामुळे जवळपास 13 जण ठार झाल्याचा दावा केला जात आहे. कारखान्याच्या आर, के ब्रँचमध्ये हा स्फोट झाला. त्यात संपूर्ण इमारत उद्धवस्त झाली. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती असल्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article