अभिनेता सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 29 जानेवारी पर्यंत सैफच्या आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. यावर आरोपी मोहम्मद शरीफुल याच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्याची गरज नव्हती असा युक्तीवाद केला आहे. शिवाय याप्रकरणात मला फसवलं जात आहे… असं मोहम्मद शरीफुल याने त्याच्या वकिलांना सांगितलं आहे.
न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मोहम्मद शरीफुल याच्या वकिलांना माध्यमांसोबत संवाद साधाल. ‘कोर्टाला मी स्पष्ट सांगितलं होतं की पोलीस कस्टडीची गरज नाही. आरोपीची चौकशी पूर्ण झालेली आहे. शिवाय आरोपीकडून हत्यार जप्त केले आहेत. फिंगरप्रिंट्स घेतले आहेत. एकही कारण पोलीस कोठडी वाढवून देण्यासाठी योग्य वाटत नाही. पण पोलिसांकडे पोलीस कोठडी मागण्यासाठी कोणतंही सबळ कारण नव्हतं.
त्यामुळे शस्त्र जप्त केल्यावर आरोपी सोबत असलाच पाहिजे असं काही नाही, असा युक्तिवाद मी केलाय. पण काही तरी शोधायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर आरोपींची गरज असते. पण इथे पोलिसांनी सर्व चौकशी केली आहे. हे मॅटर हाईप आहे. त्यामुळे कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ‘
पुढे वकील म्हणाले, आरोपीला पकडण्यात आलं. तेव्हा पोलिसांनी सैफच्या घरी जाऊन चौकशी केली आहे. त्यांनी इंटरोगेशन केलं आहे. आरोपीचीही चौकशी केली आहे. सीमकार्डची माहिती आरोपी कसं देणार. सीडीआर काढला तर सीमची माहिती मिळेल. त्यासाठी आरोपीच्या चौकशीची गरज नाही.
आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांना ताबडतोब कळवलं पाहिजे. पण या प्रकरणात तसं घडलं नाही. मी आरोपीशी बोललो आहे. तो घाबरला आहे. त्याला सर्व प्रक्रिया सांगितली आहे. मी काहीच केलं नाही. मी तो नाहीच. फुटेजमधील व्यक्ती मी नाही. मला फसवलं जात आहे, असं आरोपीचं म्हणणं आहे.
आरोपींने गुन्हा केला हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा कोर्टासमोर आला नाही. फेस रेकेग्नेशन तुम्ही पाहा. त्याचे डोळे, नाक आणि चेहरा पाहता फोटोतील व्यक्ती आणि आरोपी तो नसल्याचं दिसत आहे. असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे.