बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला.हल्ल्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सैफ अली खानला नुकताच डिस्चार्ज मिळाल्यावर त्याने वांद्रे पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आहे. जबाबामध्ये त्याने 16 जानेवारी रोजी झालेल्या त्या जीवघेण्या हल्ल्याचा रात्रीचा थरार पोलिसांना सांगितला आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, सैफ अली खानने पोलिसांना सांगितले की, तो आणि पत्नी करीना कपूर 11 व्या मजल्यावर बेडरुममध्ये होते. मात्र त्याच दरम्यान आम्हाला आमच्या घरात काम करणाऱ्या मदतनीस एलियामा फिलीप यांच्या किंचाळण्याचा आवाज आला. तिचा आवाज ऐकताच मी मुलगा जहांगीर (जेह) च्या खोलीकडे धाव घेतली जिथे फिलीप पण झोपते. मात्र तिथे एका अज्ञात व्यक्तीला पाहिले. जेह घाबरुन रडत होता. मी त्या अज्ञात व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने माझ्यावर चाकूहल्ला केला. त्या हल्लेखोराने पाठीवर, मानेवर आणि आजूबाजूला सपासप वार केले. जखमी अवस्थेतच मी त्या हल्लेखोराला मागे ढकलले आणि जेहला फिलीप बाहेर घेऊन पळाली. त्यानंतर जेहच्या खोलीतून बाहेर आलो आणि हल्लेखोराला खोलीत बंद केल्याचे त्याने सांगितले.
सैफ पुढे म्हणाला की, फिलिपने नंतर सैफ अलीला जेहच्या खोलीत हल्लेखोर पाहिल्याचे सांगितले आणि हल्लाखोराने एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. सैफ अली खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हल्ल्याच्या रात्री सैफ अली खान स्वत: ऑटोमधून जखमी अवस्थेत लिलावतीमध्ये पोहोचला होता.