अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा खून

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

12 Oct 2024, 6:20 am

Updated on

12 Oct 2024, 6:20 am

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. याप्रकरणी तरुणाच्या आईला अटक करण्यात आली असून, प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल लालसिंग ठाकूर (वय ३०) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना लोणीकंद येथील तळेरानवस्ती येथे गुरुवारी (दि. १०) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अनिलची आई सुमित्रा लालसिंग ठाकूर (वय ५५, रा. वाघमारे स्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हिला अटक करण्यात आली. सुमित्राचा प्रियकर प्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय ३४, रा. वाघमारेवस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोही मारहाणीत जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिलचा भाऊ सुनील ठाकूर (वय ३२) याने याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा आणि तिची मुले अनिल, तळेरानवस्ती लोणीकंद भागात राहायला आहेत. मजुरी करून आपला उदर्निवाह करतात, या भागात राहणाऱ्या आरोपी प्रफुल्लशी सुमित्राचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधाची कुणकुण अनिलला लागल्याने त्याचे आई सुमित्राशी भांडण झाले होते.

गुरुवारी (दि. १०) मध्यरात्री सुमित्रा, तिचा प्रियकर प्रफुल्ल यांच्याशी अनिलचा वाद झाला. त्या वेळी प्रफुल्ल आणि सुमित्रा यांनी अनिलला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांनी त्याच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या अनिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमित्राला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article