अमित ठाकरे यांचा मतदारसंघ ठरला:मनसेने सलग दोनदा गमावलेल्या माहिममधून लढणार

2 hours ago 1
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे नेत्यांची बैठक घेऊन रणनीती आखली. राज यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे हेसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. माहिम मतदारसंघातून ते लढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. खरे तर अमित यांच्यासाठी भांडूप मतदारसंघ सोडायला शिंदेसेनेने तयारी दर्शवली होती. पण मनसेने माहिम मतदारसंघ निवडला. २००९ मध्ये माहिममधून मनसेचे नितीन सरदेसाई ४८ हजार मतांनी विजयी झाले होते. नंतर २०१४ मध्ये शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्याकडून मनसेचे सरदेसाई व २०१९ मध्ये संदीप देशपांडे पराभूत झाले होते. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात यंदा ‘राजपुत्र’ स्वत: उतरणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article