अहिल्यानगर शहरात क्षयरोगमुक्त अभियान राबवणार:मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचे प्रतिपादन, जिल्हा हमाल पंचायतमधील माथाडी कामगारांची तपासणी‎

1 day ago 1
मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय पंतप्रधानमंत्री मुक्त भारत अभियान राबवण्यात आले. क्षयरोगमुक्त नगर करण्यासाठी शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात क्षयरोगमुक्त अभियान राबवणार आहे, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. यावेळी निश्चय वाहनाचेही उद्घाटन आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा हमाल पंचायत येथे झालेल्या माथाडी कामगार आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन मनपा आयुक्त डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, उपायुक्त विजयकुमार मुंडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सतीश राजुरकर, डॉ. साहिल शेख, संजय घुले,हमाल पंचायत चे उपाध्यक्ष गोविंद सांगळे आदी उपस्थित होते. केंद्र शासनाकडून यावेळी डॉ. ललित महेंद्र जागतिक आरोग्य सल्लागार,डॉ. सुवर्णा रामटेके जागतिक आरोग्य सल्लागार, डॉ.करण नागपूरकर यावेळी त्यांनी विविध आरोग्य केंद्रांना भेट दिली असता क्षयरोग विभागाचे कामकाज चांगले असल्याचे सांगितले. १०० दिवसीय मोहिमेमध्ये ८४ रुग्ण आढळले. आयुक्त डांगे म्हणाले, क्षयरोग हा १०० टक्के बरा होऊ शकतो. माथाडी कामगार हे सतत कष्टाची कामे करत असतात. त्यांना त्यांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देता यात नाही, म्हणून केंद्र सरकारच्या वतीने या अभियानचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून मोफत एक्स-रे काढण्यात येतो तसेच जिल्हा हमाल पंचायत ही सुद्धा माथाडी कामगार यांच्या साठी विविध उपक्रम राबवून त्यांचे आरोग्य कसे चांगले राहील या कडे लक्ष देत असते . जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष घुले म्हणाले, माथाडी कामगार यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून त्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी ही वेळोवेळी केली पाहिजे. माथाडी कामगार हा सर्वात जास्त कष्टाची कामे करत असतो. आज मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे शिबीर राबवून कामगारांना जागेवर सर्व तपासणी फत करून मिळणार आहे. या शिबिरामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलाजीच्या सर्व मशीन या ठिकाणी तपासणीसाठीची व्यवस्था केली होती. तपासणीसाठी डॉ आयेशा शेख ,डॉ.विनय शेळके, डॉ.अनुराधा इथापे ,डॉ.शर्वरी काटे यांची टीम होती. सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी, तर आभार डॉ आयेशा शेख यांनी मानले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article