अहिल्यानगरमधील 261 साधकांनी केली तब्बल 800 तास ध्यानधारणा:तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त अखंड 25 तास महाध्यान
3 days ago
2
तेजज्ञान फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवानिमित्त नुकतेच येथील अहिल्यानगर शहरातील हॅपी थॉट्स कार्यालयात अखंड २५ तास महाध्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहर परिसरातील २६१ साधकांनी सुमारे ८०० तास ध्यानधारणा केली. दरम्यान, हा उपक्रम देशभरात राबवण्यात आला. त्यात देशातील ११ हजार २५ साधकांनी तब्बल ३५ हजार ८८८ तास ध्यानधारणा करताना एक अनोखा विक्रम केला आहे. जीवनातील ध्यानाचे महत्व लक्षात घेऊन तेजज्ञान फाउंडेशन अर्थात हॅपी थॉटसच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपासून ध्यान-धारणेवर काम करीत आहे. उच्चतम व विकसित समाजनिर्मिती हा तेजज्ञान फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. १९९९ साली स्थापन झालेल्या तेजज्ञान फाउंडेशनचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्त अहिल्यानगर सेंटरच्या वतीने १६ व १७ नोव्हेंबर रोजी २५ तास अखंड महाध्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हॅपी थॉटस् बिल्डिंग, जाधव पेट्रोलपंपामागे हा ध्यान महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. या अखंड ध्यानामध्ये अर्ध्या तासापासून ते सुमारे दोन तासांपर्यंत अनेकांनी ध्यानधारणा केली. देशातील ४५० ध्यानग्यान केंद्रांवर एकाच वेळी याच वेळेत तब्बल २५ तास सलग ध्यान करण्यात आले. देशातील २९ राज्यांतील ९०० शहरांतील साधकांनी यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन सहभाग नोंदवून ध्यानधारणा केली. रौप्य महोत्सवानिमित्त तेजाश्रम येथे ध्यान करताना अहिल्यानगर शहरातील साधक. ध्यानामुळे भविष्याची चिंता कायमची सुटली ^ मागील ८ वर्षांपासून मी तेजज्ञान फाउंडेशनसोबत जोडलो गेलेलो आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महाध्यान महोत्सवात सहभागी होताना सलग सहा तास ध्यान केले. या ध्यानधारणेमुळे जीवनात अनेक बदल झाले आहे. घरात, कार्यालयातील लोकांशी वागताना, बोलताना, विचार करताना फरक पडला. भविष्याची सतत चिंता वाटत असे. आता वर्तमानकाळात जगू लागलो आहे. सुभाष दिघे, साधक, सावेडी.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)