मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बांगलादेशी महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही महिला लाडकी बहिण योजनेचा गैरवापर करत होती. या प्रकरणात एका दलालालाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ राज्यातील कोट्यावधी महिलांना मिळाला असून त्यामुळे ही सतत चर्चेत असते. पण याच योजनेबद्दल आता एक महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशी महिलने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला सु्द्धआ अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. दक्षिण मुंबईतील कामठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ही बातमी अपडेट होत आहे.