Sanjay Raut onslaught connected CM Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 33 दिवस उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपींना मोका लावण्यात आला आहे. पण तपासावर अजूनही विरोधकच नाही तर सत्ताधारी गोटातील आमदार सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
संजय राऊतांचा घणाघात
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. त्याला 33 दिवस उलटून गेले आहे. या गुन्ह्यातील सात आरोपींना मोका लावण्यात आला आहे. पण तपासावर अजूनही विरोधकच नाही तर सत्ताधारी गोटातील आमदार सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा तपासावर बोट ठेवत, सरकारच्या भूमिकेवर कोरडे ओढले आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाच्या धोरणावर आसूड ओढले.
‘आका’वर मोका नाही
वाल्मीक कराड याच्या इशाऱ्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आता सात आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. त्यात वाल्मीक कराडचे नाव नाही. यासंबंधी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत आहेत की कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडले आणि इतर आरोपींना मोका लावला असा घणाघात राऊतांनी केला.
हे सुद्धा वाचा
बातमी अपडेट होत आहे…