आता त्यांना काय तोंड दाखवू?:नरहरी झिरवळ सरकारवर नाराज, आदिवासी मुलांसाठी झाले हतबल

2 hours ago 1
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात पेसा कायद्यांतर्गत आदिवासी मुलांची भरती व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मंत्रालया शेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवसाची वेळ मागितली होती तसेच भेटून चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप भेटीची वेळ दिली नसल्याने नरहरी झिरवळ निराश झाल्याचे दिसत आहे. विद्यार्थी घरी येऊन बसले आहेत, आता त्यांना काय तोंड दाखवू? असा सवाल झिरवळ यांनी उपस्थित केला आहे. एका वृत्तवाहिनीला बोलताना नरहरी झिरवळ यांनी त्यांचे दुःख व्यक्त केले. पेसा अंतर्गत भरती सुरु व्हावी म्हणून आम्ही गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना तोडगा काढण्याची विनंती केली होती. पण या प्रश्नाकडे सरकार संवेदनशीलपणे पाहत नाही असे म्हणावे लागेल, असे झिरवळ म्हणाले. पुढे बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले, सरकार आणि सरकारपुढे असलेली आव्हाने आम्ही देखील मान्य करतो. आम्ही सुद्धा तसे काही चुकीचे मागत आहे, असे नाही. तुम्हालाही अडचण येत आहे असेही नाही. मुख्यमंत्री म्हणाले एक दिवस थांबा. परवा सुनावणी होईल. सुनावणी दरम्यान निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह निकाल झाला तरी कोर्टाच्या आदेशाच्या आधीन राहून आदेश काढू, असे झिरवळ म्हणाले. सुनावणीसाठी किती तारखा पडेल माहीत नाही. त्या ऐवजी सरकारने वेगळा पवित्रा घ्यायला लाऊ नये ही विनंती आहे. आम्ही वाट बघत आहोत. मुख्यमंत्र्यांचा व्याप खूप आहे. आम्हाला त्यातला थोडा वेळ हवा आहे. सरकार नुसते गोल गोल फिरवत असल्याची भावना मुलांमध्ये तयार झाली आहे. ही मुलं वेगळ्या स्टेपला जाण्याच्या मनस्थितीत आहेत. आम्ही या मुलांना थांबवत आहोत, असेही झिरवळ यांनी सांगितले. नरहरी झिरवळ म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांचे ऐकले. आम्ही काल वाट पहिली. माझ्या घरी सुरुचीवर मुलं-मुली येऊन बसली आहेत त्यांना मी काय तोंड दाखवणार? त्यामुळे आज पक्ष कार्यालयात येऊन बसलो. इथे येऊन दोन तास बसलो आहे. आज वाट पाहू नंतर आम्ही ठरवू काय करायचे, असा सूचक इशारा झिरवळ यांनी दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article