आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी संकल्प करण्याची गरज:संजय कुलकर्णी यांचे मत, भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात

2 hours ago 1
जनजाती योद्धा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आदिवासींनी सुशिक्षित होण्याचा, धर्मांतरण न करण्याचा, संस्कृती जपण्याचा, आरोग्यदायी जीवन जगून समाजाच्या उद्धारासाठी व प्रगतीसाठी संकल्प करणे आवश्यक आहे. संघर्ष करा, संघटिक व्हा, सुशिक्षित व्हा, अन्यायाविरोधात संघर्ष करून देशासाठी बलिदान करा, ही बिरसा मुंडा यांची शिकवण व विचार अंमलात आणून भारतमातेला मोठे करण्याचा प्रयत्न करू, हीच भगवान बिरसा मुंडा यांना योग्य श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रमाचे हितरक्षा प्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले. जनजाती योद्धा भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती देशभर जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आली. अहिल्यानगर जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने शोभायात्रा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. सजवलेल्या रथातील भारतमाता, भगवान बिरसा मुंडा, टंट्या भिल्ल यांच्या प्रतिमाचे पूजन रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित व अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे हितरक्षा प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी अहिल्यानगर जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष महेंद्र जाखेटे, सचिव निळकंठ ठाकरे, विशारद पेटकर, नगर संघटन मंत्री सोमनाथ पवार, शोभयात्रा प्रमुख प्रशांत आढाव आदी उपस्थित होते. संजय कुलकर्णी पुढे म्हणाले, की आदिवासी समाजातील योद्धा बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडत आदिवासींच्या संघर्षाची सुरुवात केली. मात्र, त्यांचे कार्य समाजापुढे आणले गेले नाही. केंद्र सरकारने पहिल्यांदाच क्रांतिकारी आदिवासी बिरसा मुंडा यांचे कार्य देशापुढे आणण्यासाठी राष्ट्रीय उत्सव सुरू केला. अनेक कायदे, योजना आदिवासी समाजासाठी सुरू केल्या. मात्र, आदिवासी समाज संघटीत नसल्याने यापासून वंचित आहे. आदिवासींनी समाजहितासाठी, न्याय हक्कासाठी संघटित होणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. गावित म्हणाल्या, बिरसा मुंडा यांनी उलगुलान आंदोलन छेडत मातृभूमीसाठी आयुष्यभर काम केले. त्यांनी केवळ आदिवासींसाठीच नाही, तर संपूर्ण मानव जातीसाठी काम केले आहे. त्यांच्या महान कार्याची प्रेरणा घेवून सर्व आदिवासी समाजाने देशसेवा करावी, असे आवाहन केले. प्रास्ताविकात नगर संघटन मंत्री सोमनाथ पवार यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती दिली. विशारद पेटकर यांनी सूत्रसंचालन, तर मिलिंद मुळे यांनी आभार मानले. आदिवासींचे आराध्य दैवत येडू माईच्या ओव्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. आदिवासींमुळे निसर्ग समृद्ध संजय कुलकर्णी पुढे म्हणाले, की आदिवासी समाज स्वतः गरीब राहून निसर्गाला समृद्ध केले. देशावर आलेल्या प्रत्येक आक्रमणाला सर्वप्रथम धैर्याने तोंड देत देशासाठी बलिदान पत्करले. अशा आदिवासी समाजाची प्रतिमा जाणूनबुजून डागाळल्याचे त्यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article