आधुनिक अभिमन्यूने भेदून टाकला मविआचा चक्रव्यूह:आता मुख्यमंत्रिपदासाठी पाऊल टाकतील फडणवीस
3 hours ago
1
मी आधुनिक अभिमन्यू आहे. महाविकास आघाडीचा चक्रव्यूह कसा भेदायचा हे मला माहीत आहे, असे फडणवीस वारंवार सांगत होते. ते त्यांनी प्रत्यक्षात आणूूनही दाखवले. नवे चेहरे दिले, बंडोबांना थंड केले 1 लोकसभेत महायुतीला जागावाटपात खूप उशीर झाला. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरत नव्हते. ती चूक विधानसभेला सुधारली.
2 काही मतदारसंघांत भाजप उमेदवारांविषयी रोष होता. तो ओळखून त्यांना बदलून नवे चेहरे दिले.
३ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे फडणवीसांवर सतत हल्ला करत होते. पण त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलेच नाही.
4 भाजपमधील बंडोबांना थंड करण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेदाचा यशस्वी, भेदक वापर केला.
२०१९ मध्ये बहुमत मिळवले, पण उद्धव ठाकरेंना सोबत राखता आले नाही. त्यामुळे अडीच वर्षे सत्तेबाहेर बसावे लागले होते. अजित पवारांना सोबत घेतल्याने नाराज भाजप समर्थकांना वळवण्यात यश आले नाही. लोकसभेच्या निकालानंतर संघाला शरण गेले. व्होट जिहादचा मुद्दा अखेरच्या टप्प्यात आक्रमकपणे मांडला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)