महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केले आहे.
दिल्लीतील माझ्या प्रिय भगिनींना आणि बंधूंना या जबरदस्त आणि ऐतिहासिक जनादेशासाठी मी नमन करतो. मला प्रत्येकाचा खूप अभिमान आहे. कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यामुळे उत्कृष्ट निकाल लागला. आम्ही आणखी जोमाने काम करु आणि दिल्लीतील लोकांची सेवा करु, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे…