उत्तरप्रदेशातील बदायू जिल्ह्याचे नशीब चमकले आहे. या जिल्ह्यात आता विकासाची गंगा वाहणार आहे. कारण देखील तसेच घडले आहे. बदायू जिल्ह्यात जमीनीच्या खाली कच्च्या तेलाचे मोठे साठे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. या शोधाचा शास्रीय पद्धतीने धांडोळा करण्यासाठी अल्फाजिओ ( इंडिया ) ही कंपनी कामाला लागली आहे. सध्या या कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उघैती क्षेत्रातील टिटौली गावात डेरा टाकून आहेत. संभाव्य तेल भांडाराचा सखोल शोध सुरु आहे.
वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरु
अनेक महिन्यांपासून अल्फाजिओ इंडीया ही कंपनी उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील विविध क्षेत्रात वैज्ञानिक पद्धतीने कच्च्या तेलाचा शोध घेत आहे. कंपनीची विशेष टीम बोरिंग तंत्राने आणि जीपीएस सॅटेलाईटद्वारे या खनिज संपत्तीचा शोध घेत आहे.
बोरिंग प्रक्रिया : संभाव्य क्षेत्रात ट्रायपॉड लावून बोरिंग खणण्याचे काम सुरु आहे.
हे सुद्धा वाचा
ब्सास्टींग तंत्रज्ञान : बोरिंगनंतर शुटर मशिनने जमिनीत हल्का ब्लास्ट केला जातो
जीपीएस ट्रॅकींग : सॅटेलाईट सिस्टीम द्वारे डेटा जमा करुन संशोधन सुरु आहे.
काही स्थानांवर डीझेल आणि पेट्रोल असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे येथे ही प्रक्रीया वेगाने केली जात आहे. संपूर्ण परीक्षण पूर्ण झाल्यानंतर विस्तृत रिपोर्ट भूगर्भ वैज्ञानिकांकडे सोपवला जाणार आहे. त्यानंतरच बदायुच्या जमीनीत नेमके किती कच्चे तेल अस्तित्वात आहे हे समजू शकणार आहेत.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
तेल शोधण्याच्या प्रक्रीयेत शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कंपनीने शेतकऱ्यांना त्याची भरपाई देण्याची योजना आखली आहे. ज्याची जमीन या प्रभावित भागात मोडते त्यांना एक पावती दिली जात आहे. त्यात त्याचे नाव, गाव, बँकेचे तपशील आणि प्रभावित क्षेत्राची माहिती नमूद केले जात आहे. त्याआधारे नुकसान भरपाईची रक्कम ठरविली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम त्वरित पाठविली जात आहे. जर कोणत्या शेतात तेलाचा साठा सापडला तर स्वतंत्र वेगळी रक्कम दिली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रीयेचा इतर शेतकाऱ्यांच्या शेतीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांची शेती ते नेहमी प्रमाणे करु शकतात असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.