आम्ही देखील कुंभ मेळाव्याला गेलो होतो. आम्ही संगामावर स्नान देखील केले आहे. येथे चेंगराचेंगरीची घटना झालीय परंतू ती एवढी मोठी नव्हती. सर्वकाही मॅनेज करण्यात आले होते.मला यासंदर्भात इतके माहिती नाही. परंतू घटना इतकी मोठी नव्हती जेवढी ही वाढवून सांगितली जात आहे असा आरोप मथुरा येथील भाजपाचे खासदार हेमा मालिनी यांनी केला आहे. कालच समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी गंगेत अनेक मृतदेहांना टाकण्यात आल्याने हे संगमाचे पाणी अशुद्ध झाले असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर आता खासदार हेमा मालिनी या बचावासाठी उतरल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ दरम्यान मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे शाही स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन ३० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात संसदेत आरोप प्रत्यारोप सरु आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकार या दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या खासदार जया बच्चन यांनी देखील त्याची री ओढत चेंगराचेंगरीतील मृतदेहांना नदीत टाकल्याचा आरोप केला होता.
आम्ही देखील कुंभला गेलो होतो. आम्ही संगमावर स्नान देखील केले. येथे दु:खद घटना घडली. परंतू एवढी मोठी नव्हती. सर्वकाही मॅनेज केले गेले, मला याच्या बाबत इतकी माहिती नाही परंतू घटना काही एवढी मोठी नव्हती जेवढी ती वाढवून चढवून सांगितली जात आहे अशा विधान भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रयागराजला जाऊन पवित्र स्नान करणार आहेत. जर स्थिती मॅनेज झाली नसती तर पंतप्रधान तेथे गेले असते का? असा उलट सवालही हेमा मालिनी यांनी केले आहे. यावर बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की अखिलेश यांचे कामच चुकीचे बोलणे आहे. घटना घडली पण एवढी मोठी नाही असा हेका हेमामालिनी यांनी कायम ठेवला आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेत सहभाग घेताना महाकुंभ येथील चेंगराचेंगरीतील मृतांच्या आकड्यांवरुन अनेक सवाल केले आहे.