कोल्हापूर : थेट पाईपलाईन, विमानतळ विस्तारीकरण, विरंगुळा केंद्र, अभ्यासिका, मॉडेल स्कूल, कळंबा संवर्धन, क्रीडांगण विकास अशी विकासाची भाषा आम्ही बोलतो. विरोधक मात्र धमकीची भाषा बोलत आहेत. फक्त विकासाचे व्हिजन घेऊन काम करत असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले. आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गडमुडशिंगी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.
गटनेते रावसाहेब पाटील म्हणाले, साडेचार वर्षे गायब असलेले महाडिक निवडणूक आल्यावर जागे झालेत. आमच्या आमदारांनी कामे केली नाहीत, असे सांगत फिरणार्या महाडिकांना आ. पाटील यांच्या कामांचा हा घ्या पुरावा, असे सांगत त्यांनी कामाची यादीच सभेत वाचून दाखवली. सरपंच अश्विनी शिरगावे म्हणाल्या, आ. पाटील यांना मुडशिंगी गावातून मोठे मताधिक्य देऊ. यावेळी पांडुरंग कांबळे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख सुनील मोदी, राजू यादव, सरलाताई पाटील, जय पाटील, संजय पाटील, विनोद सोनुले, किरण आडसूळ आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अशोकराव पाटील, बाबासाहेब माळी, प्रदीप झांबरे, आनंदा बनकर, सचिन पाटील, वळिवडे सरपंच रूपाली कुसाळे, संतोष कांबळे, सुकुमार देशमुख, अरुण शिरगावे, संदीप गौड, सुदर्शन पाटील, छाया नेर्ले, अलका सोनुले, सूरज कांबळे, राहुल सूर्यवंशी, दिलीप थोरात, संजय सकटे, सरिता कांबळे, तेजस्विनी सूर्यवंशी, दीपक मगदूम, राजू वळिवडे, सचिन यादव उपस्थित होते.
आधी धमकी मग महाडिकांची सारवासारव
महिलांचा अवमान करायचा, धमकीची भाषा वापरायची आणि पुन्हा सारवासारव करायची ही खा. धनंजय महाडिक यांची वृत्ती महिलांनी ओळखली असून, त्याच योग्य उत्तर देतील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी दिला.