शिरपूर हा तालुका दोन आमदारांमुळे गतिमान:रोहिणीच्या सभेत आमदार पटेल यांचे प्रतिपादन

2 hours ago 1
दोन आमदारांमुळे शिरपूर तालुका अधिक गतिमान आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील अन्य तालुक्यांची परिस्थिती बघा व शिरपूर तालुका बघा. तालुक्याच्या विकासासाठी संपूर्ण पटेल परिवार कार्यरत आहे. भाजप शिवाय पर्याय नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना दिल्या. संविधान कधीही बदलणार नाही. आरक्षणही कायम राहील. शिरपूरच्या विकासासाठी काशिराम पावरा यांची गरज असल्याचे मत आमदार अमरीश पटेल यांनी व्यक्त केले. रोहिणी येथे रत्नाप्पाण्णा कुंभार माध्यमिक विद्यालयात सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार अमरीश पटेल म्हणाले की, आमदार कार्यालय व भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल मार्फत १२० युवक विविध योजनांचा लाभ देण्यासाठी काम करता आहे. आदिवासी भागातून डॉक्टर व मोठे अधिकारी तयार व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. खर्दे येथे १ हजार बेडचे तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल निर्माण केले जाते आहे. यात अत्याधुनिक १७ ऑपरेशन थिएटर असतील. तालुक्यातील विद्यार्थ्यांना अधिकारी म्हणून घडवण्यासाठी अत्याधुनिक स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले जाते आहे. विकासासाठी आर्थिक निधीची गरज असते. राज्य व केंद्र सरकारकडून निधी आणण्यासाठी भाजपला मदत करा, असेही ते म्हणाले. आमदार काशिराम पावरा, प्रवासी नेते दीपक देसाई, भाजप महायुतीचे समन्वयक डॉ. तुषार रंधे, जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, अरुण धोबी, किशोर माळी, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नारायणसिंग चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article