छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना सर्व जातींना एकत्र केले. त्याच राज्यात भाजप जातीपातीचे राजकारण करून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत आहे. महाविकास आघाडीची सत्ता येताच जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आमदार अतुल लोंढे यांनी या वेळी दिले.
.. अन् उमेदवार बहिरट पुन्हा परतले
अखंड मराठा समाजाचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला अनेक मराठा समाजातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट हेही उपस्थित झाले. मात्र, माजी आमदार मोहन जोशी यांनी त्यांच्याशी व्यासपीठावर येण्यापूर्वी चर्चा केली अन् काही मिनिटांतच बहिरट पुन्हा प्रचारासाठी परतले.
सकल मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, अॅड. भगवानराव साळुंखे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, माजी आमदार मोहन जोशी, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, बार असोसिएशनचे अॅड. संतोष खामकर, अॅड. मिलिंद पवार, गजानन थरकुडे, संघटनेचे समन्वयक बाळासाहेब अमराळे, प्रशांत धुमाळ, युवराज दिसले, प्राची दुधाने, विशाखा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.