इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझरिया येथील निवास्थानी दोन फ्लॅश बॉम्ब टाकले गेले. ते फ्लॅश बॉम्ब घराच्या उद्यानात पडल्याचे इस्त्रायलची अंतर्गत सुरक्षा संस्था शिन बेट आणि पोलिसांनी सांगितले. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सुरक्षा संस्थांनी सांगितले. फ्लॅश बॉम्ब हल्ला झाला तेव्हा नेतन्याहू आणि त्यांचा परिवार घरी नव्हता. या घटनेची चौकशी सुरु करण्यात आल्याचे शिन बेट या संस्थेकडून सांगण्यात आले. या प्रकरणामुळे इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज संतप्त झाले आहे. त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट X वर शेअर केली आहे. त्यात म्हटले, या घटनेनंतर शत्रूने सर्व लाल रेषा ओलांडल्या आहेत. सुरक्षा संस्थांना योग्य ते पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेची जबाबदारी सध्यातरी कोणीही घेतलेली नाही.
काय म्हणाले संरक्षणमंत्री
इस्त्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी म्हटले की, पंतप्रधान नेत्यनाहू यांच्या घरावरील हल्ल्यानंतर शत्रूने सर्व सीमा ओलांडल्या आहे. इराण आणि त्यांच्या हस्तकाकडून नेत्यनाहू यांच्या हत्येचा प्रयत्न सुरु आहे. परंतु त्यांच्यासाठी ते अशक्य आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सीझरिया येथील घराकडे ड्रोन सोडण्यात आले होते.
त्यावेळी नेत्यनाहू यांना आणि त्यांच्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु इस्रायलकडे अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा असूनही ते ड्रोनपासून सुरक्षित नाही हे या घटनेने अधोरेखित केले होते.
BREAKING:
🇮🇱 2 airy bombs were identified that were changeable adjacent to Netanyahu's location successful Caesarea and landed successful the courtyard of the house. pic.twitter.com/k0ygeglfgc
— Mega Geopolitics (@MegaGeopolitics) November 16, 2024
ड्रोनचा शोध का घेऊ शकत नाही?
इस्रायलकडे ताशी 1,000 मैलांपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा आहे. परंतु त्याच्या रडार प्रणालींला ड्रोनचा शोध घेणे शक्य नाही. कारण ड्रोन 100 mph मैलांपेक्षा कमी वेगाने जातात. इस्रायली सैन्य ऑक्टोबर 2023 पासून लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाह आणि हमाससोबत युद्ध करत आहे. ड्रोनमध्ये धातूचा वापर कमी होतो. तसेच ते रॉकेट आणि शेल्सपेक्षा कमी उष्णता निर्माण करतात. यामुळे ते शोधता येत नाहीत.